शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

औषधांच्या पुरवठ्यात घाटीमध्ये ‘मक्तेदारी’

By admin | Updated: July 3, 2017 01:05 IST

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात विविध औषधांचा काही ठराविक कंपन्यांकडूनच पुरवठा होत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालयात विविध औषधांचा काही ठराविक कंपन्यांकडूनच पुरवठा होत आहे. या कंपन्यांशिवाय ही औषधी प्राप्त होऊ शकत नाही. वेळेवर बिले प्राप्त न झाल्यास त्यांच्याकडून पुरवठा बंद होतो आणि रुग्णांची गैरसोय होते. मक्तेदारीमुळे अडवणूक करणाऱ्या या कंपन्यांना स्पर्धक शोधण्याऐवजी त्या कंपन्यांची बिले प्राधान्याने देण्याची सूचना घाटी प्रशासनाने केली आहे. या कंपन्यांसमोर घाटी प्रशासनाची शरणागती आहे की, व्यवहारिक तडजोड याविषयी वैद्यकीय वर्तुळातच खमंग चर्चा आहे.औषधी व साहित्याचा पुरवठा करणाऱ्या विविध कंपन्यांचे पैसे वेळोवेळी थकत असल्याने घाटीला दरपत्रकावरील कंपन्यांकडून औषधी पुरवठा थांबविला जातो. औषधी खरेदीत होणारे घोटाळे टाळण्यासाठी आणि या व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी सेंट्रल पर्चेस कमिटीकडून औषधी खरेदी करून पुरवठा करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे स्थानिक खरेदीवरही (लोकल पर्चेस) निर्बंध आले आहेत. गेल्या काही महिन्यांत औषधांची थकबाकी ७ कोटींवर पोहोचली होती. त्यातून मध्यंतरी घाटीतील औषधी पुरवठा विस्कळीत झाला. मे महिन्यात औषधींच्या तुटवड्यामुळे बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभागात गोरगरीब रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. नाईलाजाने पदरमोड करून बाहेरून औषधी खरेदी करण्याची वेळ रुग्णांंवर आली.मे महिन्यात घाटी रुग्णालयाकडून सामान्य आणि अत्यावश्यक अशा ६७ प्रकारच्या औषधींची यादी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयास (डीएमईआर) पाठविण्यात आली. तसेच मंजूर झालेल्या १ कोटी ६३ लाखांच्या निधीतून थकबाकीदारांची बिले अदा करण्यात आली. उच्च रक्तदाब, मधुमेह, विविध प्रकारची प्रतिजैविके यासह महत्त्वाच्या औषधांच्या कायम तुटवड्याला घाटीला सामोरे जावे लागते.घाटीला काही औषधींचा पुरवठा ठरावीक कंपन्यांकडून होतो. त्यांची बिले थकल्यास थेट पुरवठा थांबविला जातो. यातूनच रुग्णसेवा विस्कळीत होते. औषधी प्राप्त होण्यास अन्य पर्याय नसल्याने थकित बिले देण्याशिवाय पर्याय नसल्याचा दावा घाटी प्रशासनाकडून केला जात आहे.