अहमदपूर : निसर्गाची साथ नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे़ त्यातच केंद्रातले मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हिताविरोधी आहे़ त्यामुळे शेतकरी उधवस्त झाला आहे़ लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदिंनी मोठी आश्वासने दिली़ परंतु मोदींकडे शेतकऱ्यांच्या विकासाची दृष्टी नाही. त्यांना गुजरातच्या पुढे काही दिसतही नाही, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केली़अहमदपूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अहमदपुरात ते सोमवारी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब जाधव होते़ मंचावर उमेदवार बाबासाहेब पाटील, उदगीरचे उमेदवार संजय बनसोडे, निलंग्याचे उमेदवार बस्वराज पाटील नागराळकर, आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डी़एऩ शेळके, अविनाश जाधव, भारत रेड्डी, भाग्यश्री क्षीरसागर, मिनाक्षी शिंगडे, शालुबाई कांबळे, शिवानंद हेंगणे, बाळासाहेब टाकळगावकर, मोजिद पटेल, निवृत्ती कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले, शेतकरी, शेतमजुरांना रोजगार मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत़ शेतीला जोडधंदा म्हणून मतदारसंघात दुग्धव्यवसाय, फळबागा आदी उद्योग उभारण्यात येतील़ सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले़ अध्यक्ष समारोप माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी केला़ यावेळी उमेदवार बाबासाहेब पाटील यांचेही भाषण झाले़४शेतकरी कुटुंबांशी आमची नाळ जुळली असल्याने आम्ही शेतकऱ्याच्या हितासाठीच काम केले़ दिल्लीची सत्ता आता आमच्याकडे नाही, परंतु ती कशी वाकवायची हे तुमच्या हातात आहे़ या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही संधी आली आहे़ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करीत आहेत़ महाराष्ट्रात, देशात काय करणार हे सांगण्यापेक्षा ते आमच्यावर टिका करीत आहेत़ मी ७ वेळा विधानसभा आणि ७ वेळा लोकसभा अशा १४ निवडणुका जिंकल्या आहेत़ मग असा माणूस निवडणुकांना घाबरतो का, असेही शरद पवार म्हणाले़ गेल्या काही महिन्यात केंद्र सरकारने घेतलेले निर्णय शेतकऱ्याच्या हिताविरोधात आहेत़ साखरेचे अनुदान बंद केले आहे़ ऊसाचे भाव पडत आहेत़ सोयाबीन तेलाची आयात सुरु केल्याने ३८०० रूपयाचे सोयाबीन २८०० रुपयावर येऊन ठेपले आहे़ कांदा निर्यात बंद केली आहे़ त्यामुळे त्याचेही भाव घसरले़ कापसाचीही अशीच अवस्था आहे़ शेतकऱ्याच्या मालाला चार पैसे अधिक मिळावेत ही भावना सरकारची नाही़
मोदी सरकार शेतकरी विरोधी
By admin | Updated: October 7, 2014 00:16 IST