राजेश खराडे , बीडपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरातच कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुसरीकडे या सभेची मोठी उत्सुकता बीडकरांना असल्याचेही दिसत होते. दुपारी तीन वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहरातील प्रमुख मार्गावर शुकशुकाट असल्याचे दिसत होते. दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू होताच सातत्याने गजबजलेले सुभाष रोड, मोंढा रोड, धोंडीपुरा टिळक रोडवर कमालीचा शुकशुकाट जाणवत होता. मात्र नागरिकांची गर्दी होती ती खाद्यपदार्थाच्या गाड्यांभवती व पिण्याच्या पाण्याची स्टॉलवरती. शनिवारी सकाळी नेहमी प्रमाणे बाजारपेठेतील दुकाने खुली झाली खरी परंतु नागरिकांनी मात्र बाजारपेठेकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले. त्यामुळे शनिवारी बाजारपेठांवर मोदींचा इफेक्ट झाला असल्याचे दिसले. सकाळपासून ४ वाजेपर्यंत एकही गिऱ्हाईक दुकानाची पायरी चढली नसल्याचे कारंजा रोड येथील किराणाा दुकानदार केदार मानधने यांनी सांगितले.भारनियमनाने केले बेजारजिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून भारनियमन सुरू करण्यात आले आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा असल्याने भारनियम बंद ठेवावे किंवा वेळेत बदल करवा अशी मागणी नागरिकांनी केली होती. मात्र महावितरण कंपनीने या मागणीकडे दुर्लक्ष करीत सबंध बीडकरांचे डोळे टि.व्ही संचाकडे लागले असताना सभा सुरू होताच आर्ध्या बीडात विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. तर ज्या भागात विद्युत पुरवठा केला गेला त्या ठिकाणातील केबल चे कनेक्शन बंद करण्यात आले होते.सभा सुरू होताच शहरातील शाहू नगर, कारंजा रोड, राजुरी वेस, बुंदिल पुरा आदी भागात भारनियमनामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना मोदी यांचे भाषण ऐकता आले नाही़
बाजारपेठांवरही ‘मोदी इफेक्ट’
By admin | Updated: October 5, 2014 00:49 IST