शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मॉडेलस्कूल रद्द, इमारतींचे काय ?

By admin | Updated: February 19, 2016 00:34 IST

भोकरदन : महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व मॉडेलस्कूल बंद केल्या. मात्र या मॉडेलस्कूलसाठी भोकरदन शहरात ४ कोटी २३ लाख रूपये खर्च करून इमारत

भोकरदन : महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व मॉडेलस्कूल बंद केल्या. मात्र या मॉडेलस्कूलसाठी भोकरदन शहरात ४ कोटी २३ लाख रूपये खर्च करून इमारत व वसतिगृकाचे बांधकाम पूर्ण केले. शासन आता या इमारतीचा तसेच वसतिगृहाचा वापर कशासाठी करणार याचे कोडे सुट शकलेले नाही. राज्यातील प्रत्येक तालुक्यात मॉडल स्कूल सुरू केल्या होत्या. या शाळेसाठी कंत्राटी पध्दतीवर शिक्षकांची नेमणूक करून चार वर्षे या शाळा जिंल्हा परिषद शाळांच्या इमारतीमध्ये चालविल्या. त्यानंतर या शाळेसाठी स्वतंत्र इमारत व वसतिगृहांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर सुध्दा केला होता. त्यामध्ये राज्यात युतीची सत्ता आली, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व आ. संतोष दानवे यांच्या प्रयत्नामुळे राज्यातील मॉडेल स्कूलच्या इमारत व वसतिगृहासाठी शहरालगतच्या जोमाळा शिवारातील गायराण जमिनीमध्ये ७ एकर क्षेत्रावर ३ कोटी ३ लाख रूपयाची शाळेची इमारत व १ कोटी २० लाख रूपयांच्या वसतिगृह इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे़ इमारतीचे बांधकाम अर्धवट झाले असतानाच शासनाने या मॉडेल स्कूल बंद करण्याचा निर्णय घेतला. शाळेत तीन ते चार वर्षांपासून ६ वी ते ८ वी पर्यंत शिक्षण घेत असलेले ११९ विद्यार्थी व विद्यार्थीनीना शहरातील न्यू हायस्कूल व शिवाजी विद्यालयात वर्ग करून जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरू असलेली ही मॉडेल शाळा बंद केली होती़ मात्र इमारत व वसतिगृहाचे काम सुरू होते. त्यामुळे आता इमारतीचे बांधकाम बंद होणार की सुरूच राहणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले होते मात्र शासनाच्या सर्वशिक्षा अभियान अंतर्गत जिल्हापरिषदेने या बांधकामासाठी निधी उपलब्ध केल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. भोकरदन येथील जिल्हा परिषदेचे उपअभियंता एम. एस़ आकोडे व कनिष्ठ अभियंता अनिल जाधव यांनी सांगितले, सदर इमारतीचे बांधकाम हे गटशिक्षण अधिकारी कार्यालया अंतर्गत येते. मात्र त्यांच्याकडे सक्षम कर्मचारी नसल्याने या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी जिल्हा परिषद उपविभाग भोकरदन अंतर्गत करण्यात आले. ४या इमारतीचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत या इमारतीसाठी २ कोटी २० लाख रूपये तर वसतिगृहासाठी ९० लाख रूपये खर्च करण्यात आले असल्याचे आकोडे व जाधव यांनी सागितले़ एकूणच कोट्यवधी रूपये खर्च करून इमारतपूर्ण होत असली तरी या इमारतीचे करायचे काय असा प्रश्न कायम आहे.