औरंगाबाद : महापालिकेच्या प्रभागनिहाय जलवितरण यंत्रणेतच दोष असल्याचे स्पष्ट झाले आहे. जायकवाडीतून कधी नव्हे ते १५६ एमएलडी पाणी उपसण्यापर्यंत मनपाच्या यांत्रिकी विभागाने मजल मारली आहे. तेवढे पाणी शहरापर्यंत येत नसल्यामुळे अडचण निर्माण होत आहे. १३६ एमएलडी पाणी शहरातील ५८ जलकुंभांपर्यंत पोहोचत आहे. शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, तर दुसरीकडे जायकवाडी ते औरंगाबाद शहरापर्यंत येणार्या दोन जलवाहिन्यांतून सुमारे २० एमएलडी पाण्याची गळती होत आहे. ही गळती आहे, की पाण्याची चोरी हा संशोधनाचा विषय आहे; मनपाच्या जलउपसा केंद्रापर्यंत पाण्याचा प्रवाह येण्यासाठी अॅप्रोच चॅनलचे काम गतवर्षी दुष्काळात करण्यात आले. त्यामुळे उपसा केंद्रापर्यंत पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात आहे. तेथून दररोज १५० ते १५६ एमएलडी पाणी उपसले जात आहे. मात्र, शहरापर्यंत पोहोचेपर्यंत त्यातील २० एमएलडी पाणी मध्येच गळते आहे. वितरणातील दोष असा... धरणातून रोज १५० एमएलडी पाणी उपसले जाते. १५ कोटी लिटरचा तो आकडा आहे. १३ लाख लोकसंख्येला ते पाणी प्रति व्यक्ती १२० लिटरप्रमाणे पुरू शकते. मात्र, २० एमएलडी पाणी चोरी किंवा गळतीमध्ये जाते. शहरातील जलकुंभ एकाच वेळी भरण्यातही अनेक अडचणी येत आहेत. ७० टक्के जलकुंभ अर्धेही भरत नाहीत. दरडोई १३५ लिटर पाणी देणे मनपाला बंधनकारक आहे. मनपा सध्या ७८ लिटर पाणी दरडोई देत आहे. वर्षातून चार महिने पाणीपुरवठा होत असून, दरडोई १४ हजार लिटर पाणीपुरवठा मनपा करते. ३६५ दिवसांसाठी ३ हजार ५० रुपये पाणीपट्टी वसूल केली जात असून, १२० दिवस वर्षातून तर महिन्यातून १० दिवस पाणीपुरवठा होतो. १५ जुलैपर्यंत जिवंत जलसाठा जायकवाडी धरणात सध्या १०.७८ टक्के पाणीसाठा आहे. १५ जुलैपर्यंत तो साठा पुरेल. अॅप्रोच चॅनलमुळे ४५० मीटरपर्यंत पाणी खाली गेले तरी अडचण येणार नाही. जलउपसा केंद्रातील १४०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीवरील ५ आणि ७०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीवरील ३, असे ८ पंप पाणी उपसत आहेत, असे उपअभियंता यू. जी. शिरसाठ, के. एम. फालक यांनी सांगितले. पाण्याचे प्रेशरही बर्यापैकी असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पूर्ण क्षमतेने पंपिंग होत आहे. असा होतो पाणीपुरवठा शहराला जायकवाडीतून १५६ आणि हर्सूल तलावातून ५ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. दररोज १६१ एमएलडी पाणीपुरवठा ५८ जलकुंभांपर्यंत होतो. १९७२ साली ७०० मि़ मी़ आणि १९९२ साली टाकलेल्या १४०० मि़ मी़ जलवाहिनीतून शहराला पाणी येते. या दोन्ही जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत़ टँक रच्या २७५ फेर्या ११८ पैकी ७० गुंठेवारी वसाहतींमध्ये टँकरने पाणीपुरवठा होतो. एन-७, एन-५, कोटला कॉलनी येथून टँकर भरले जातात. दररोज २७५ टँकरच्या फेर्या होतात. ३ हजार रुपये एका वर्षाला दिवसाआड पाणीपुरवठ्यासाठी मनपा आकारते. त्यातून दिवसाआड २०० लिटरचा १ ड्रम पाणी दिले जाते. गेल्या वर्षी २ हजार रुपये दर होता.
मनपाच्या जलवितरण यंत्रणेतच दोष!
By admin | Updated: May 8, 2014 00:16 IST