शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

राज्यमंत्री देशमुखांसाठी आहे मनोहर तरी...

By admin | Updated: June 16, 2014 01:15 IST

दत्ता थोरे , लातूर लातूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री अमित देशमुख यांच्यापुढे विरोधी पक्षातून सध्या तरी समर्थ विरोधक नाही.

दत्ता थोरे , लातूरलातूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री अमित देशमुख यांच्यापुढे विरोधी पक्षातून सध्या तरी समर्थ विरोधक नाही. त्यामुळे लातूर शहरमधून ‘सबकुछ अमित देशमुख’ असेच चित्र आहे. परंतु निवडणुका येईपर्यंत काही काँग्रेसमधल्याच इच्छुकांचे पक्षांतराचे ‘मतलबी’ वारे वाहिले तर मात्र अमित देशमुख यांची डोकेदुखी वाढू शकते. विरोधी पक्षापेक्षा पक्षातील विरोधकांना सोबत घेण्याचे वा त्यांचे पक्षांतर रोखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. दिवंगत विलासरावांचा राजकीय वारस म्हणून अमित यांची गेल्या विधानसभा निवडणुकीत ‘आमदारकी’च्या रुपाने प्रतिष्ठापणा झाली. काँग्रेसचा आणि विलासरावांचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात कायमच देशमुखांचा वरचष्मा राहिला आहे. अपवाद फक्त ९५ ला शिवाजीराव कव्हेकर पाटील यांच्या रुपाने फिरलेल्या ‘चक्रा’चा होता. त्यानंतर पुन्हा जी लातूरवर देशमुखांनी मांड ठोकली ती आजतागायत शाबूत आहे. लातुरात साहेबांची पुण्याई अनेकांसाठी लाभदायक ठरली. राज्यमंत्री अमित तर गढीच्या रक्ताचे आणि विलासरावांचे वारस. विलासरावांच्या निधनानंतर ते स्वत:च्या पहिल्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्या सोबतीला राजकारणातला अर्क असलेले काका आ. दिलीपराव देशमुख यांचे कवचकुंडलं आहेतच. लोकसभेला दत्तात्रय बनसोडे गुरुजींसाठी ते एकदा सामोरे गेले होते. मात्र सपशेल अपयश आले. लोकसभेतील सारी गणिते विधानसभेला लागू होतातच असे नाही. महायुतीच्या वाट्यात ही जागा सेनेची. पण सेनेच्या भात्यात चांगला ‘बाण’ नाही. पत्रकापुरते अस्तित्व असलेल्या सेनेकडे जिल्हाप्रमुख पप्पू कुलकर्णी एकमेव नाणे आहे, पण त्याला खणखणाट नाही. सेनेचे मनपात सहा मेंबर, पण विधानसभेच्या दृष्टीने एकही टोकदार नाही. खुद्द जिल्हाप्रमुखांना दोन विधानसभेसह नगरपरिषदेतही पराभव झेलावे लागले. उडती खबर अशी आहे की औशातून दोन वेळा लढलेल्या प्राचार्य सूर्यभान जाधव यांनी मातोश्रीवरून आशीर्वाद आणलेत. मनपात एकही सदस्य नसलेल्या भाजपाला लातूर शहरातही मोदी लाटेवर विधानसभेला विजयाचे मखर चढवायची स्वप्ने पडत आहेत. परंतु पक्षातल्या इच्छुकांपेक्षा काँग्रेसमधील शैलेश लाहोटी या तरुण चेहऱ्याला भाजपात खेचायच्या जोरदार हालचाली चालू आहेत. लाहोटी हे भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या संपर्कात असून ते लवकरच भाजपात जाणार अशा वावडीची वावटळ गेल्या दोन महिन्यांपासून लातूरमध्ये भिरभिरते आहे. त्याला लाहोटी खरेही म्हणीत नाहीत आणि खोटेही नाही. पण आमदार होण्याची त्यांच्या मनातील इच्छा लपून राहिली नाही. शिवाय त्यांची लोकप्रियताही मोठी आहे. भाजपाकडे म्हणाल तर शहरात निलेश ठक्कर हा जुना एक चेहरा आहे. पण मुन्सिपालिटीत यांचाही एकदा पु. ल. देशपांडेंच्या कथेतल्यासारखा अण्णू गोगटे झालेला. तेव्हांपासून स्वत:ची क्षमता बाजूला ठेवून ते विजनवासातच आहेत. ९५ च्या चमत्काराचे धनी असलेल्या शिवाजीराव पाटील कव्हेकरांसह आता जवळपास सर्व सक्रीय पक्ष झाले आहेत. काँग्रेसमध्ये देशमुखांचे ते पक्षांतर्गत विरोधक म्हणून परिचित आहेत. शहर आणि ग्रामीण अशा दोघांपैकी एक मतदारसंघ मिळावा, ही त्यांची मनिषा आहे. लोकसभेच्या पराभवानंतर या दोनच मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक बोलावून त्यांनी पराभवाची कारणमीमांसा केली. त्यांना नाकारणे काँग्रेसला बंडखोरीला निमंत्रण देण्यासारखे आहे. गेली ४० वर्षे काँग्रेसमध्ये असलेल्या चाकूरकर गटाचा कसलाच पत्ता अद्याप ओपन नाही. एकाची झाकली मूठ आणि दुसऱ्याचा ओपन ‘पंजा’ या साऱ्यांना राज्यमंत्री अमित हे कसा शह देतात यावर त्यांची वाटचाल आहे. लातूर शहरात महाराष्ट्र विकास आघाडीचे अ‍ॅड. अण्णाराव पाटील हे कायम आपला लढाऊ बाणा दाखवित आले आहेत. तत्वाची आणि सत्वाची लढाई घेऊन अ‍ॅड. पाटील यंदाही रिंगणात येण्याची शक्यता दाट आहे. २००९ : प्रमुख ३ उमेदवारांची मते...काँग्रेसअमित देशमुख११३००६बसपाखय्युमखान पठाण२३५२६शिवसेनाश्रीपाद कुलकर्णी१९९०५इच्छुकांचे नाव पक्षशिवाजीराव पाटील काँग्रेसअ‍ॅड़ अण्णाराव पाटील मविआशैैलेश लाहोटी - श्रीपाद (पप्पू) कुलकर्णी शिवसेना