शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएमचा मार्ग स्वतंत्र!

By admin | Updated: November 16, 2014 00:09 IST

औरंगाबाद : मजलीस- ए- इत्तेहाद- ए- मुस्लिमीन (एमआयएम) आणि भारतीय जनता पार्टी राजकारणातील दोन वेगवेगळी टोके आहेत. ती एकत्र कधीच येऊ शकत नाहीत.

औरंगाबाद : मजलीस- ए- इत्तेहाद- ए- मुस्लिमीन (एमआयएम) आणि भारतीय जनता पार्टी राजकारणातील दोन वेगवेगळी टोके आहेत. ती एकत्र कधीच येऊ शकत नाहीत. महाराष्ट्र विधानसभेत आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही, देणारही नाही. आमचा मार्ग वेगळा असल्याचे प्रतिपादन खा. असदोद्दीन ओवेसी यांनी केले.आमखास मैदानावर भर पावसात आयोजित सभेस आ. इम्तियाज जलील, डॉ. गफ्फार कादरी, माजी मंत्री गंगाधर गाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की, भाजपाने महाराष्ट्र विधानसभेत ज्या पद्धतीने विश्वासमत पारित केले ते खूपच हास्यास्पद होते. आम्ही काँग्रेस- राष्ट्रवादीला पाठिंबा देणार नाही. काँग्रेसने तेलंगणच्या मुद्यावर काय केले. मोक्का कायदा त्यांनीच पारित केला. राष्ट्रवादीचे नेते आता मोदींच्या सुरात सूर मिळवीत आहेत. हे सर्व राजकारण अत्यंत खालच्या पातळीवरचे असल्याचे त्यांनी आपल्या शैलीत नमूद केले.वक्फ बोर्डाच्या जमिनी ज्या धनाढ्य मंडळींनी बळकावल्या आहेत, त्या परत घेण्यात येतील. त्यासाठी पक्षाचे आमदार विधानसभेत आवाज बुलंद करतील. वेरूळ येथे शस्त्रसाठा पकडल्यानंतर ज्या निष्पाप तरुणांना नऊ वर्षांपासून तुरुंगात ठेवण्यात आले, त्यांचा निकाल लवकरात लवकर लावावा. एटीएसने औरंगाबादच्या नईमला कोठे ठेवले, या सर्व प्रश्नांची उत्तरे विधानसभेत सरकारला विचारण्यात येतील. औरंगाबाद शहराला पुन्हा ऐतिहासिक दर्जा मिळवून देण्यात येईल, असेही ओवेसी यांनी सांगितले. तत्पूर्वी, आ. इम्तियाज जलील यांचे भाषण झाले. या जाहीर सभेत काही अपक्ष, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी प्रवेश केला. आज सकाळी खा. ओवेसी यांनी अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा येथे भेट दिली. त्यानंतर त्यांनी आ. इम्तियाज जलील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले.