शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

लाखोंचे खत-बियाणे उघड्यावर

By admin | Updated: March 18, 2015 00:20 IST

राजेश खराडे , बीड शेती व्यवसाय बेभरवशाचा झाला असल्याने त्यांना शेती करण्यासाठी लागण्याऱ्या विविध कंपन्यांची बी-बियाणे, औषध व खत मोफत देऊन त्यांना आधार देण्यात येतो.

राजेश खराडे , बीडशेती व्यवसाय बेभरवशाचा झाला असल्याने त्यांना शेती करण्यासाठी लागण्याऱ्या विविध कंपन्यांची बी-बियाणे, औषध व खत मोफत देऊन त्यांना आधार देण्यात येतो. मात्र कृषी कार्यालयाच्या वतीने हे साहित्य सर्व तालुका कृषी कार्यालयास पाठविल्याचे दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात एक्सपायरी डेट संपण्यापूर्वी ते गोदामाच्या समोरच फेकून दिले असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनद्वारे समोर आणला आहे. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळ पडत असल्याने शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. दरम्यान, जुन-जुलै २०१४ च्या खरीप हंगामासाठी शासनाकडून जिल्हा कृषी कार्यालयास बी-बियाणे, पिकांवर फवारण्याची औषधी, शेती औजारे व खते प्राप्त झाली होती. हे साहित्य तालुका कृषी कार्यालयास पाठवून त्याचे वितरण शेतकऱ्यांना करणे आवश्यक होते मात्र ते झाले नसल्याचा संशय ‘लोकमत’ने केलेले स्टिंग आॅपरेशनमधून समोर आला आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतो का? याकरिता लोकमत प्रतिनिधींनी येथील गोदामाची पाहणी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला. अधिकारीचे म्हणतात शेतकऱ्यांचे दुर्लक्ष कृषी विभागाने उपलब्ध करुन दिलेली साधन सामुग्री विविध माध्यमातून शेतकऱ्यांच्या तालुका कार्यालयातून देणे आवश्यक आहे. याची माहिती देण्यासाठी गावपातळीवर बैठका घेणे, मोबाईलद्वारे एस.एम.एस. करणे, माहिती केंद्रामार्फत शेतकऱ्यांना महिती देणे बंधनकारक आहे. अशी माहिती तालुका कृषी कार्यालयाने दिली की नाही हे तपासण्याची वेळ आली असल्याचे म्हणण्यास हरकत नाही. कारण उपलब्ध साहित्याची जनजागृती मोठ्या प्रमाणात झाली असती तर याची मागणी वाढली असते. जिल्हा कृषी कार्यालयाकडे कागदोपत्री रिपोर्ट क्लीअर पाठवत आहेत. वरिष्ठ याकडे अर्थपूर्ण दर्लक्ष करीत आहेत काय असा संशय निर्माण झाला आहे. दरम्यान खरीप व रबी हंगामासाठी खत व बी- बियाणे खरेदी करण्याची अनेक शेतकऱ्यांची ऐपत नसते. उसनवारी घेऊन त्यांना पेरणी करावी लागते. मात्र कृषी कार्यालयामार्फत साहित्य वाटप होत नसल्याने नाराजी आहे.बीड शहरातील जिल्हा कृषी कार्यालगत असलेल्या गोदामाची अत्यंत दुरावस्था झालेली असल्याचे समोर आले. गोदामावरील पत्रे अर्धवट तुटलेली आहेत. ४गेल्या पंधरा दिवसांमध्ये अवकाळी पाऊस झाला. पावसाचे पाणी खतांवर पडल्यामुळे त्याचा अक्षरक्ष: गोळा तयार झाला आहे. हे खत वापरायोग्य आहे की नाही याची पहाणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. ४विशेष म्हणजे गोदामात खते, बी-बियाणे ठेवण्यासाठी केवळ चार खोल्या आहेत. त्या पैकी काही खोलींच्या वरचे पत्रे तुटलेली आहे.४पावसाच्या पाण्यामुळे खते भिजत आहेत तर औषधी खराब होत चालली असल्याचे समोर आले आहे. रायझोबम, हेमोकिल ही द्विदल पिकांसाठी वापरण्यात येणारी जैविक खताची पोती वाटण्याऐवजी गादोमातच सडत आहेत. किडींपासून पिकांचे संरक्षण होण्यासाठी कृषी कार्यालयाकडे विविध औषधे पुरवविण्यात आली.४त्यातील किती औषधी वाटली हा तपासण्याचा भाग आहे मात्र गोदामाबाहेर पडलेल्या औषधांची पाहणी केली असता पेन्डीसम्राट (५०० मिली), अल्ट्रानेक्स (५०० ग्रॅम), कृषिउद्योग रु.१९५, निम पॉवर ही औषधे कालबाह्य दिनांक २०१६ असतानाही उकिरड्यावर टाकण्यात आली आहे.जिल्हा कृषी कार्यालयातून खते, बी-बियाणे, औषधांची वर्गवार करून तालुका कृषी कार्यालयाकडे वर्ग केली जातात.४तालुका कृषी कार्यालयाकडे सदरील सर्व साहित्य वर्ग केल्याची आवक-जावक असली तरी प्रत्यक्षात जवळपास अर्ध्याहून अधिक औषधी, बी-बियाणे व खते येथील गोदामातच सडत पडलेली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे साहित्य का वाटले नाही, हा मुद्दा या निमित्ताने समोर आला आहे.