शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

ढाब्यावर लाखोंचा गुटखा जप्त

By admin | Updated: January 15, 2017 01:06 IST

तुळजापूर : शहरानजीक सोलापूर रोडवरील चंद्रलोक ढाब्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी शनिवारी दुपारी विशेष पथकासह कारवाई केली़

तुळजापूर : शहरानजीक सोलापूर रोडवरील चंद्रलोक ढाब्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी शनिवारी दुपारी विशेष पथकासह कारवाई केली़ या कारवाईत लाखो रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे़ दरम्यान, राज्य शासनाने गुटखाविक्रीवर बंदी घातलेली असतानाही अन्न व औषध प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे शहरासह जिल्हाभरात गुटखाविक्री तेजीत सुरू आहे़तुळजापूर शहरानजीकच्या सोलापूर मार्गावरील चंद्रलोक ढाब्यावर गुटख्याचा अवैध साठा करून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ या माहितीवरून दस्तुरखुद्द सहाय्यक पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांनी पोना शिवाजी सिरसाट, दीपक नाईकवाडी, शाम छत्रे आदींच्या पथकासमवेत शनिवारी दुपारी धडक कारवाई केली़ या कारवाईवेळी ढाब्यावर लाखो रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे़ पोलिसांनी कारवाईची माहिती दिल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तुळजापूर पोलीस ठाण्यात धावून गेले़ कारवाईला सहा तासाहून अधिकचा वेळ लोटला तरी अधिकाऱ्यांना गुटख्याचा ताळमेळ लागत नसल्याचे सांगत होते़ राज्य शासनाने राज्यात गुटखा विक्रीस बंदी घातली आहे़ मात्र, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अवैधरित्या गुटखाविक्री करणाऱ्यांकडे साफ डोळेझाक केली आहे़ नव्हे अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या आजू-बाजूलाही मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटखाविक्री होत आहे़ असे असतानाही केवळ पोलीस अधिकाऱ्यांनी धाड मारल्यानंतरच अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी पंचनामा करून गुटख्याची होळी करण्याचे काम करीत असल्याचे चित्र मागील काही महिन्यांपासून शहरासह जिल्हाभरात दिसून येत आहे़दरम्यान, सहाय्यक पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांनी धडक कारवाई करून मुद्देमाल जप्त केला असला तरी किती रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, याची माहिती रात्री उशिरापर्यंत अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी देऊ शकले नाहीत़ परिणामी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात तुळजापूर पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती़ (वार्ताहर)