औरंगाबाद : मराठवाड्यात पुरवठा विभागाने राबविलेल्या बोगस रेशनकार्ड शोधमोहिमेत ६ लाख ३६ हजार कार्डधारकांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. त्यापैकी ३ लाख ७५ हजार कार्डधारकांकडे बोगस रेशन कार्ड आढळले असल्याची माहिती पुरवठा विभाग सूत्रांनी दिली. हे कार्ड रद्द करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला पुरवठा विभागात सार्वजनिक वितरण प्रणाली राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्य सरकारने आॅनलाईन वितरण प्रणाली राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बोगस रेशनकार्डधारक शोधमोहीम राबविली. शहरासह गावागावांतील रेशन दुकानदारांकडून कार्डधारकांची यादी मागविली. या मोहिमेत ६ लाख ३६ हजार कार्डधारक रेशन दुकानातून धान्य घेत नसल्याचे आढळून आले. हे कार्ड रद्द करण्यात आले. त्यापैकी ३ लाख ७५ हजार रेशन कार्ड दुबार असल्याचे निष्पन्न झाले असून, बोगस रेशन कार्ड घेऊन लाभ घेणाऱ्या कार्डधारकांची नावे यादीतून वगळण्यात आली. त्यामुळे धान्याचे नियतन कमी झाले. धान्याचा काळाबाजार रोखण्यात विभागाला यश आल्याचा दावा पुरवठा विभागाने केला आहे. १ लाख २० हजार बोगस रेशन कार्ड औरंगाबाद जिल्ह्यात आढळून आले.
पावणेचार लाख रेशनकार्ड बोगस
By admin | Updated: June 23, 2016 01:27 IST