परळी : तालुक्यात पेरणीपुरता पाऊस झाला़ त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने खरीपाची पेरणी केली़ परंतु महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी आता हवालदिल झाला आहे़ सोयाबीन, कापूस या महत्वाच्या पिकांनी माना टाकल्या आहेत़ मूग, हायब्रीड ही पिकेही हातची गेली आहेत़ तसेच हिरवा चारा नसल्याने दुधाळ जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून वर्षभर संसाराचा गाडा कसा हाकायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे़
परळी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसाय चालविला जातो़ मात्र यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने हा व्यवसाय अडचणीत आला आहे़दूध उत्पादन घटलेमहिन्यापासून पावसाने दडी मारल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ पाण्याची समस्या उद्भवत आहे़ परिणामी दुधाचे उत्पादन घटले आहे़ खरीप पिकांनी माना टाकल्या असून चार दिवसांमध्ये पाऊस न पडल्यास हातची पिके जाण्याची शक्यता आहे, असे नागापूरचे शेतकरी मनोज मस्के यांनी सांगितले़दूध संघास फटकापरळी तालुका दूध संघाच्या कार्यालयात तालुक्यातील शेतकरी दररोज ५०० लिटर दूध विक्रीसाठी आणत होते़ मात्र आता यामध्ये ३०० लिटरची घट झाली असून २०० लिटरच दूध विक्रीसाठी येत आहे, असे दूध संघाच्या वतीने सांगण्यात आले़शासनाने उपाययोजना कराव्यातपावसाअभावी परळी तालुक्यातील पिके धोक्यात आली आहेत़ यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे़ जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने शेतकरी जनावरे बाजारात दाखल करु लागला आहे़ शासनाने यावर त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी भाजपचे श्रीहरी मुंडे यांनी केली आहे़पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीरपावसामुळे पिकेही तर सुकूच लागली आहेत शिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ अनेक गावांना आजही पाणीटंचाई जाणवत आहे़ काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ पिण्याचे पाणी पुरविण्याबरोबरच शासनाने शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही तालुक्यातील शेतकऱ्यांमधून पुढे येत आहे़ (वार्ताहर)
परशासनाकडून मदतीची अपेक्षा महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल
४पाऊस नसल्याने हिरव्या चाऱ्याचा प्रश्न बनला गंभीर४हिरवा चारा नसल्याने दुधाळ जनावरे बाजारात विक्रीला४पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बनला गंभीर४तालुक्यात ३०० लीटरने दूध उत्पादनात घट