शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
4
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
5
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
6
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
7
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
8
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
9
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
10
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
11
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
12
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
13
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
14
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
15
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
16
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
17
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
18
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
19
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
20
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड

दुधाला दही भारी

By admin | Updated: February 8, 2015 00:12 IST

प्रताप नलावडे , बीड दूधाचा सतत घसरणारा भाव आणि त्या मुळे बसणारा फटका यावर बीड जिल्ह्यातील डोंगरपट्यातील गावांनी नामी युक्ती शोधली असून बाजारात दूधाऐवजी

प्रताप नलावडे , बीडदूधाचा सतत घसरणारा भाव आणि त्या मुळे बसणारा फटका यावर बीड जिल्ह्यातील डोंगरपट्यातील गावांनी नामी युक्ती शोधली असून बाजारात दूधाऐवजी दही विक्री करत त्यांनी आपले उत्पन्न दुप्पट केले आहे. बीड तालुक्यातील डोंगरपट्यातील सुमारे एक हजार शेतकरी सध्या या दही विक्रीच्या व्यवसायात गुंतले आहेत.बीड शहरात दररोज हे शेतकरी सकाळी दही घेऊन येतात आणि दुपारी पुन्हा आपल्या गावी परतात. दररोज शहरात डोंगरपट्टा भागातील २२ गावामधून १५ हजार लिटर दही येते. प्रत्येक दही विकणाऱ्या शेतकऱ्याचा दही विक्री करण्यासाठीचा शहरातील भाग ठरलेला आहे. शिवाय हॉटेलसाठीही हे शेतकरी दही देतात.दूधाचे भाव घसरले म्हणून केवळ रडत बसण्यापेक्षा दूधापासून आपले उत्पन्न वाढविण्यासाठीचा या शेतकऱ्यांनी केलेला हा प्रयोेग इतरांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. दूध विक्री करूनही उत्पादन खर्च आणि येणारे उत्पन्न याचा मेळ बसत नसल्याचे पाहून बीड तालुक्यातील मांडव जाळी, पिंपळवाडी, भाळवणी, नागझरी, बेलखंडी, चऱ्हाटा, या गावातील शेतकऱ्यांनी थेट दूध विकण्यापेक्षा घरच्या घरीच दूधापासून दही तयार करून त्याची विक्री करण्याचा फंडा उपयोगात आणला.साधारणपणे १० लिटर दूधाची विक्री केल्यानंतर हातात दररोज ४०० रूपये येतात. जनावरांची देखभाल आणि चाऱ्यासाठी होणारा खर्च आणि दूधापासून मिळणारे उत्पन्न याचा मेळही बसणे यामुळे कठिण होत होते. या परिसरातील काही शेतकऱ्यांनी दूधापासून दही करणे, दह्यावर जमा होणाऱ्या सायीपासून तूप करणे आणि तूप तयार करताना तयार होणारे ताक याची विक्री करत हे उत्पन्न चक्क दुप्पट केले. दही तयार करण्यासाठी कसलाही खर्च येत नाही. घरच्या घरीच ही प्रक्रिया करता येते. साधारण १० लिटर दूधापासून १० लिटर दही तयार होते. एक किलो तूप आणि चार लिटर ताक तयार होते. दही ३० रूपये लिटरने बाजारात विक्री होते. एक किलो तुपाचे ५०० रूपये आणि ताकाचे एका लिटरला २० रूपये मिळतात. हा सगळा हिशोब पाहिला तर त्याच १० लिटर दह्याचे ८०० रूपये शेतकऱ्यांच्या हाती पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळातही चार पैसे मिळू लागले आहेत. बीड शहर परिसरातील डोंगर पट्ट्यातील शेतकरी दुधासोबत दह्याचा व्यवसाय करू लागले आहेत.४दूध उत्पादनाचा खर्च व मिळणारे उत्पन्न पाहता हिशेब जुळत नाही. त्यामुळे शेतकरी दुधावर प्रक्रिया करून दही विकणे पसंत करू लागले आहेत.४एकट्या बीडमध्ये तब्बल १५ हजार लीटर दही रोज येते.४याची उलाढाल लाखोंच्या घरात जाते.४हॉटेल व्यावसायिक व घरगुती ग्राहकांना ग्रामीण भागातील दह्याने भुरळ घातली आहे. उन्हाळा सुरू झाल्याने मागणी वाढली आहे.हातात चार पैसे उरतातदूधापासून दही विक्री करण्यामुळे आमचे नेहमीचे उत्पन्न दुप्पट झाले आहे. त्यामुळे किमान चार पैसे तरी आमच्या हातात उरतात. आता आम्हाला दूधाचा भाव कमी झाला काय आणि वाढला काय, त्याचे काहीच वाटत नाही. विक्रीसाठी थोडा वेळ द्यावा लागतो. परंतु आर्थिक आवकही वाढली आहे.- नानासाहेब शिंदे, शेतकरी, नागझरी