शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

वडगावकरांना एमआयडीसीचा शुद्ध पाणीपुरवठा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:02 IST

: वडगाव कोल्हाटी येथील नागरिकांची दूषित पाण्यापासून सुटका झाली असून, आता गावात एमआयडीसीचा शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथील नागरिकांची दूषित पाण्यापासून सुटका झाली असून, आता गावात एमआयडीसीचा शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे. त्यासाठी दीड कोटी रुपये खर्च करून नवीन जलवाहिनी टाकण्यात आली असून, या उपक्रमाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला.या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय सिरसाठ, सरपंच महेश भोंडवे, उपसरपंच हौसाबाई पाटोळे, सेनेचे उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले, हनुमान भोंडवे आदींच्या उपस्थितीत करण्यात आला.पंचायत समिती सदस्य राजेश साळे, सतीश पाटील, लक्ष्मण लांडे, माजी उपसरपंच सुनील काळे आदींची उपस्थिती होती. नवीन जलवाहिनीद्वारे दररोज ३ लाख लिटर पाणी गावाला मिळणार असून, येथील जलकुंभात साठवून टप्प्याटप्प्याने गावात पाणीपुरवठा केला जाणार आहे. ज्या भागात जलवाहिनी टाकण्यात आलेली नाही, अशा भागातही लवकर जलवाहिनी टाकून पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी गणेश धनवई यांनी सांगितले. श्रीकृष्ण भोळे यांनी सूत्रसंचालन तर सुनील काळे यांनी आभार मानले.येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून गाजत असून, नागरिकांना बाराही महिने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. गावातील पाणीप्रश्न निकाली काढण्यासाठी सरपंच महेश भोंडवे, उपसरपंच हौसाबाई पाटोळे व ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी एमआयडीसी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला. एमआयडीसीने पाणीपुरवठा करण्यास सहमती दर्शविल्यानंतर ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून १ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यातून गतवर्षी ५ किलोमीटरची जलवाहिनी टाकण्यात आली. मात्र, या योजनेचे काम कासवगतीने होत असल्याचा आरोप करून योगेश साळे, प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी २४ मार्चला उपोषण सुरू केले होते.