शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

‘कलादर्पणा’तून ‘लेक वाचवा’चा संदेश

By admin | Updated: July 29, 2014 01:07 IST

बीड: समाजातील गंभीर विषयांना हळूवार स्पर्श करीत कधी सखींना अंतर्मुख करीत तर कधी खळाळून हसायला लावणारे वातावरण रविवारी कार्यक्रमात पहावयास मिळाले.

बीड: समाजातील गंभीर विषयांना हळूवार स्पर्श करीत कधी सखींना अंतर्मुख करीत तर कधी खळाळून हसायला लावणारे वातावरण रविवारी कार्यक्रमात पहावयास मिळाले.निमित्त होते ते लोकमत सखीमंचच्या कलादर्पन या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून वेशभूषा आणि एकपात्री अभिनयाच्या कार्यक्रमाचे. वेगवेगळ्या भाषेत, रंगीबेरंगी वेशभूषेत सादर केलेली कला आणि एकपात्री अभिनयाच्या माध्यमातून स्त्री-भ्रूण हत्या, हुंडाबळी, मालकीण-मोलकरणीचे दैनंदिन जीवनातील प्रश्न आणि सध्या ज्वलंत असलेला कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या यासह अनेक विषयांवर सखींनी कला सादर करून आपले कलागुण तर दाखविलेच पण प्रसंगी गंभीर आशयाचे प्रश्नांवर कला सादर करून साामाजिक बांधीलकीही किती मजबूत असते याचे दिग्दर्शन केले. कलादर्पण हे हक्काचे व्यासपीठ असल्यामुळे मुरलेल्या कलाकारांसोबतच अनेक नवोदीत महिलांनी आपला प्रपंच सांभाळत सादर केलेली कला सखींच्या विकासाला एक उंची देऊन गेली. दिवसेंदिवस देशातच नव्हे तर जगात महिलांवर मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार होत आहेत. हाच धागा धरून सखी मंचच्या सदस्यांनी आपल्या कलादर्पणातून समाज प्रबोधन केले. याला आळा बसविण्यासाठी स्त्रीने धडाडीने पुढे येण्याची गरज असल्याचे त्यांनी आपल्या अभिनयातून दाखवून दिले. यावेळी लकी ड्रॉ ही काढण्यात आला. विजेत्या महिलांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले.५१ स्पर्धकांनी घेतला सहभागसखी मंच सदस्यांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धेत एकूण ५१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये फॅन्सी ड्रेसच्या स्पर्धेत २७ तर एकपात्री नाटकात २४ महिला सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. दुष्यंता रामटेके व प्रतिमा राऊत यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाट्य कलाक्षेत्रात आपले व बीड जिल्ह्याचे नाव उज्वल करणाऱ्या तसेच राज्य नाट्य सेन्सॉर बोर्डाच्या सदस्या डॉ. उज्वला वनवे यांनी केले. सूत्रसंचालनाच्या माध्यमातून त्यांनी वेगळा ठसा उमटवला आहे. कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक स्वामी विवेकानंद योगा अ‍ॅन्ड मेडिटेशन सेंटर होते. तर सहप्रायोजक म्हणून संकल्प वॉच अ‍ॅण्ड सारीज् हे होते. कार्यक्रमाला साळुंके बंधू, नीलेश ललवाणी, उत्तमेश्वर खोस, राहुल जवकर, सुवर्णा जवकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत एकपात्री नाटकात शिल्पा राऊत (प्रथम), मनीषा जायभाये (द्वितीय), पल्लवी कुलकर्णी (तृतीय), सायली देशमुख, संगीता गवते (उत्तेजनार्थ) तर फॅन्सी ड्रेसमध्ये अर्चना शहाणे (प्रथम), अंजली आढाव (द्वितीय), सुमित्रा चौधरी (तृतीय), संगीता कोठारी, आशा भारती (उत्तेजनार्थ) या स्पर्धकांना परीक्षक प्रा. दुष्यंता रामटेके, प्रतिमा राऊत, डॉ. उज्ज्वला वनवे, प्रायोजक, सहप्रायोजकांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.लक्की ड्रॉ मधील विजेत्या सखींची नावे व लागलेले बक्षीससरस्वती जाधव, सुवर्णा खेडकर (वॉटर प्युरीफायर्स), सीजा ताजतेल (फर्निचर), संध्या सानप (मिक्सर), कुसुम कांडेकर , अनघा गुळवेलकर, पंचफुला माने (साडी), उमा राऊत, संगिता डोळस, मनीषा झोडगे, विमल सवाई, सुलोचना काळे, संगीता भांडेकर, अनुराधा काळे, संगीता जायभाय, अर्चना माने, जयश्री ठाकूर (फ्रेश किट), रेखा वाघवकर,मोहिनी स्वामी, सविता आंधळे, राधिका देशपांडे, सीमा शेटे, शामल रावते, पराजी शाह, जयश्री बळे, शिवाणी वाघीरकर, अनुराधा कुलकर्णी, मीना जाधव, गंगूबाई तांदळे, कमल देशमुख, सारिका गोले, विमल लाहोटी, स्वाती पांडव, सुरेखा चौरे, सुनंदा पोकळे, प्रतिभा कापरे, रंजना मातकर, स्नेहल जाधव, सुमन आंधळे, स्वाती बनसोडे, अनिता जोगदंड, ज्योती लाहोटी, प्रीती साळुंके, रेखा भाग्यवंत, सुप्रिया देशमुख, वैशाली मोटे, मीना खेत्रे, नंदा साळुंके, संगीता सोनवणे, कांता जाधव, श्रावणी वैद्य, मीरा काळे, वैशाली धनवे, दीप जवकर, शीतल कुलकर्णी, रेश्मा शिंदे, अनुराधा प्रकाश, अंजली सरवदे, रूपाली वेले, सीमा बनसोडे, सारिका देशमुख, कुमोद सेलूकर, जईद बुगनायम, सुलभा तिपाले, ममता पाथरकर, नूतन उजगरे, शिल्पा शिंदे (कास्मेटीक गिफ्ट), सुषमा भट, अरूणा बनसोडे, शशी चव्हाण, सुनीता शिनगारे, अमृता करवा, अंकिता देशमुख, स्वाती कुलकर्णी, वैशाली नहार, स्नेहल वायकर, सरोजनी गायकवाड, सिंधू भालेराव, निकिता जव्हेरी, महानंदा पोलास, निर्मला वाघमारे, निखत शेख, सरस्वती सुकते, हर्षा चव्हाण, फरहीन बेगम, स्वरा देशमुख, सुवर्णा खेडकर, सुभदा धर्म, भावना औताडे, ललिता गुंड, शीतल वाघमारे, अमृता भोसले, रामलीला माने, मीनाक्षी कदम (हाऊसहोल्ड अ‍ॅटम्स) आदी यामध्ये ‘लकी’ ठरल्या. (प्रतिनिधी)