उदगीर : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे़ त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे़ सध्या उदगीरचे तापमान ४० अंशांवर पोहोचल्याने दिवसभर रस्ते निर्मनुष्य होत आहेत़ सायंकाळी मात्र ढगाळ वातावरणात पावसाचा शिडकाव होत असल्याने एकाच ऋतूत दोन ऋतू अनुभवयास येत आहेत़ त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे़ यंदा जागतिक हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे़ काल चक्रानुसार उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तीन ऋतू अनुभवास येतात़ दिवसाचे तापमान सध्या ४० अंशावर गेले आहे़ दिवसभर तीव्र उन्हाळा जाणवतो़ त्यामुळे दुपारच्या पारी रस्ते सुनसान होत आहेत़ मात्र दुपारी ५ वाजल्यानंतर आकाशात ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाचा शिडकाव होतो आहे़ यामुळे उखाडा अधिक असाह्य होऊन उन्हाळ्यातच उन्हाळा व पावसाळा, असे एकाच वेळी दोन ऋतू अनुभवयास येत आहेत़ या बदलामुळे शेतकरी मात्र चिंतित झाला आहे़ नित्य नियमाने हजेरी लावणारा पाऊस पेरणीच्या वेळी गायब होतो की काय या चिंतेने शेतकरी आहे़
पारा पोहोचला ४० अंशांवर
By admin | Updated: May 19, 2014 01:06 IST