शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील विविध समस्यांवर आज बैठक

By admin | Updated: June 23, 2016 01:33 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना १० जूनपर्यंत पीककर्ज देण्याची डेडलाईन ३१ जुलैपर्यंत करण्यात आली आहे. पाणीपुरवठा योजना दुष्काळामुळे ठप्प झाल्या आहेत.

औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना १० जूनपर्यंत पीककर्ज देण्याची डेडलाईन ३१ जुलैपर्यंत करण्यात आली आहे. पाणीपुरवठा योजना दुष्काळामुळे ठप्प झाल्या आहेत. पीककर्ज वाटपासाठी बँका पुढाकार घेत नाहीत. यंदा पुन्हा कृत्रिम पावसासाठी अर्थ नियोजन आहे काय? या व इतर अनेक प्रश्नांना उद्या २३ जून रोजी सकाळी ११ वा. विभागीय पातळीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीत बँकांना करण्यात येणारा पतपुरवठा आणि मराठवाड्यातील दुष्काळी नियोजन याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. बँकांना पीककर्जासाठी ९ हजार कोटी तर पीक विम्यापोटी सुमारे ४ हजार कोटी मराठवाड्यात लागणार आहेत. त्यातच ग्रामीण बँकेने शासनाकडे १५०० कोटींची मागणी केलेली आहे. राष्ट्रीय बँका कर्जपुरवठा करण्यासाठी पुढे येत नाहीत. शेतकऱ्यांची परिस्थिती गेल्या वर्षीपेक्षा यंदा वाईट झालेली आहे. याबाबत शासन काय निर्णय घेणार आहे. याकडे शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागलेले आहे. २ जुलै रोजी ‘एकच लक्ष्य २ कोटी वृक्ष’ ची मोहीम राबविण्यावरच शासनाचा भर आहे. त्यासाठी मुनगंटीवार १७ जून रोजी शहरात आले होते. त्यादिवशी त्यांनी मराठवाड्यातील विविध समस्यांप्रकरणी कुठलेही उत्तर देण्याचे टाळले होते.