शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत धार्मिक स्थळे नियमित करण्यावर बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:13 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धार्मिक स्थळ समितीची बैठक गुरुवार, १० आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात आयोजित करण्यात आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धार्मिक स्थळ समितीची बैठक गुरुवार, १० आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात आयोजित करण्यात आली आहे. विविध १३ शासकीय कार्यालयांचे प्रमुख या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. बैठकीत शासनाने काढलेल्या अध्यादेशानुसार कोणती धार्मिक स्थळे अधिकृत करता येऊ शकतात, कोणती करता येणार नाहीत. या मुद्यांवर अंतिम निर्णय होणार आहे. नागरिकांकडून सूचना आणि हरकती कधी मागवायच्या यावरही बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.महापालिकेने ११०१ धार्मिक स्थळांची यादी तयार केली होती. या यादीनुसार कारवाई करण्याचे आदेश खंडपीठाने २१ जुलै रोजी दिले होते. मनपाने आतापर्यंत ४६ पेक्षा अधिक अनधिकृत धार्मिक स्थळे काढली आहेत. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. ८ आॅगस्ट रोजी खंडपीठाने पुन्हा एकदा धार्मिक स्थळ प्रकरणी सूचना आणि हरकती मागविण्याची मुभा मनपाला दिली. त्यानुसार उद्या गुरुवारी सकाळी ११ वाजता धार्मिक स्थळ समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, वक्फ सीईओ, सिडकोचे मुख्य प्रशासक, म्हाडा, वीज कंपनी आदी १३ विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीत महापालिका प्रशासन न्यायालयाचे विविध आदेश, सद्य:स्थिती आदींची माहिती देणार आहे.मनपाने तयार केलेल्या धार्मिक स्थळांच्या यादीनुसार ‘अ’वर्ग प्रवर्गातील ५०८ धार्मिक स्थळे नियमित करण्यासारखी आहेत. ‘ब’ वर्गातील ५९२ पैकी ३९१ धार्मिक स्थळे खाजगी जागेवर आहेत. सुमारे १९० धार्मिक स्थळे वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी आहेत, ही वस्तुस्थिती समितीसमोर मांडण्यात येणार असल्याचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सांगितले. समिती यावर अंतिम निर्णय घेणार आहे. खंडपीठाच्या आदेशानुसार नागरिकांकडून सूचना, हरकतीही मागविण्यात येणार आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापण करण्यात येणार आहेत.