शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
4
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
5
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
6
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
7
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
8
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
9
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
10
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
11
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
12
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
13
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
14
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
15
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
16
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
17
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
18
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
19
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
20
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार

वैद्यकीय अधिकारी संपावर, रुग्णसेवा विस्कळीत

By admin | Updated: June 3, 2014 01:09 IST

पाचोड : विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी (मॅग्मो) सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत.

 पाचोड : विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी (मॅग्मो) सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवाच कोलमडली असून, खाजगी रुग्णालय मात्र आज हाऊसफुल दिसून येत होते. सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी हे राज्यातील ग्रामीण भागात, दुर्बल भागात, आदिवासी भागात राहून रुग्णांची सेवा करीत असतात. २०११ सालापासून शासन दरबारी विविध मागण्या प्रलंबित होत्या. यात सेवा समावेशन झालेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांना पूर्वलक्षी लाभ दिलेला नाही. राज्यातील वैद्यकीय अधिकार्‍यांना सहावा वेतन आयोग २००६ सालापासून लागू झालेला नाही. अस्थायी एम.बी.बी.एस., बी.ए.एम.एस. व बी.डी.एस. वैद्यकीय अधिकार्‍यांना अजूनही स्थायी करण्यात आले नाही, आदी विविध मागण्या प्रलंबित होत्या व शासनाने त्या मागण्या मंजूरही केल्या आहेत; पण त्यांची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही, त्यामुळे अधिकार्‍यांनी अगोदर काळ्या फिती लावून काम सुरू केले होते; पण शासनाकडून काहीच उत्तर न आल्यामुळे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारीही संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात दूरवरून येणार्‍या रुग्णांना उपचार न मिळाल्यामुळे भरउन्हात त्यांना माघारी परतावे लागले, तर काही रुग्णांनी खाजगी रुग्णालयाचा सहारा घेऊन उपचार घेतले. या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या काम बंद आंदोलनामुळे रुग्णालयातील वॉर्डात शुकशुकाट दिसून येत होता.(वार्ताहर) पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रशासनाचे आश्वासन आरोग्य उपसंचालक डॉ. रविकिरण चव्हाण म्हणाले की, वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांच्या मागण्यांसाठी जरी काम बंद आंदोलन पुकारले असले तरीही सरकारी दवाखान्यातील आरोग्य सेवा कोलमडू देणार नाही. त्याची पर्यायी व्यवस्था केली असून, कंत्राटी डॉक्टर व राष्ट्रीय बालसुरक्षा विभागातील डॉक्टरांची नेमणूक ग्रामीण रुग्णालयात व प्राथमिक आरोग्य केंद्रात करून रुग्णसेवा केली जाईल. या काम बंद आंदोलनाविषयी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजी भोजने म्हणाले की, नाइलाजास्तव आम्ही हे पाऊल उचलले आहे. आम्ही अत्यावश्यक सेवा, अपघातातील रुग्णांची तपासणी करणार असून, शवविच्छेदन आले तर करणार असल्याचे सांगितले.