शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर वसतिगृहात सुमार व्यवस्था, निकृष्ट जेवण आणि मुलांचा छळ

By admin | Updated: August 26, 2016 00:52 IST

प्रताप नलावडे, बीड ग्रामीण भागातून आलेल्या मुलांसाठी राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था करणारे जवळपास ८० खासगी वसतीगृहे शहरात असून यापैकी ५० पेक्षाही अधिक वसतीगृहे

प्रताप नलावडे, बीडग्रामीण भागातून आलेल्या मुलांसाठी राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था करणारे जवळपास ८० खासगी वसतीगृहे शहरात असून यापैकी ५० पेक्षाही अधिक वसतीगृहे बेकायदेशीरपणे चालविले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वसतीगृहाच्या नावावर चालणारा हा गोरख धंदा चालविणाऱ्यापैकी अनेकजण शिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. साईड बिझनेस म्हणून चालणाऱ्या या धंद्यातून मुले सांभाळण्याच्या नावाखाली पैसे कमावण्याचा वेगळा फंडा काही शिक्षकांकडूनच चालविला जात आहे.वडापाव खाल्ला म्हणून आदित्य राठोड या मुलाला वसतीगृह चालविणाऱ्या दिलीप जोगदंड या शिक्षकाने अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर आता शहरातील बेकायदेशीर चालणाऱ्या वसतीगृहेही चर्चेत आली आहेत. शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या काही शिक्षकांनी वसतीगृहाचा धंदाच सुरू केला आहे.एका इमारतीत सामाजिक कार्याच्या गोंडस नावाखाली वसतीगृह सुरू करायचे आणि ग्रामीण भागातील मुलांना याठिकाणी प्रत्येकी तीस ते पस्तीस हजार रूपये वार्षिक शुल्क आकारून त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करायची. एका इमारतीत दहा ते पंधरा दहा बाय दहाच्या खोल्या आणि एका खोलीत दहा ते बाराजणांची व्यवस्था, असे काहीसे या सगळ्याच वसतीगृहांचे स्वरूप आहे. वसतीगृह सुरू करताना कोणतीही परवानगी घेतली जात नाही.धर्मादाय आयुक्तांकडे रितसर नोंद असणे किंवा किमान शॉप अ‍ॅक्टचे आणि त्याच ठिकाणी जेवणाची व्यवस्था असल्याने फुड लायसेन्स तरी असणे आवश्यक आहे. परंतु असे कोणतेच सोपस्कार पूर्ण न करता ही वसतीगृहे बिनदिक्तपणे सुरू आहेत. त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्नच ऐरणीवर आला आहे.शहरातील धानोरा रोड, शिवाजी नगर, अंबिका नगर, स्वराज्य नगर, पंचशील नगर, नाट्यगृह परिसर, राजीव गांधी चौक या परिसरात अनेक खासगी आणि बेकायदेशीर वसतीगृहे चालविली जात आहेत.ज्या शाळेतील शिक्षक वसतीगृह चालवितात, त्यांच्याच शाळेतील मुले याठिकाणी राहतात. जोगदंड चालवित असलेल्या वसतीगृहात ते आदर्श शाळेत शिक्षक असल्याने त्याच शाळेतील मुले मोठ्या प्रमाणात राहतात.एका मुलासाठी आपण वीस हजार रूपये घेतो, असे सांगत जोगदंड आपल्याकडे ४० मुले असून सामाजिक कार्य म्हणून आपण हे वसतीगृह चालवितो असे सांगतात. परंतु यासाठी कोणकोणत्या परवानगी त्यांच्याकडे आहेत, असे विचारले तर सामाजिक कामाला परवानगी कशाला, असे विचारतात. ते ज्या शाळेत शिकवतात त्या आदर्श शाळेचीही त्यानी परवानगी घेतलेली नाही.