शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका औरंगाबादेत तपासणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 20:21 IST

मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका ऑनलाईन तपासण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने होकार कळवला आहे.

ठळक मुद्दे मुंबई विद्यापीठ विधि अभ्यासक्रमांच्या ५ हजार उत्तरपत्रिका पाठवल्या आहेत.कोणत्याही परिस्थितीत ३१ जुलैपर्यंत निकाल लावणे मुंबई विद्यापीठाला अनिवार्य बनले आहे. यासाठीच मुंबई विद्यापीठ प्रशासनाने उत्तरपत्रिका तपासण्यासाठी राज्यातील इतर विद्यापीठाकडे मदत मागितली आहे. विद्यापीठाने उत्तरपत्रिका तपासण्यासाठी विधि शाखेच्या १०० प्राध्यापकांची यादी मुंबई विद्यापीठाकडे पाठवली.

ऑनलाईन लोकमत 

औरंगाबाद : मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका ऑनलाईन तपासण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने होकार कळवला आहे. यानुसार मुंबई विद्यापीठ विधि अभ्यासक्रमांच्या ५ हजार उत्तरपत्रिका पाठवल्या आहेत. त्या उत्तरपत्रिका औरंगाबादेतुन तात्काळ तपासून देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या  विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका ऑनलाईन तपासण्याचा प्रयोग करण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी घेतला. मात्र या प्रयोगामुळे सर्वच अभ्यासक्रमांचे निकाल रखडले असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याची दखल राज्यपालांनी घेत ३१ जुलैपर्यंत सर्वच अभ्यासक्रमांचे निकाल लावण्याचे आदेश कुलगुरूंना दिले. 

यातच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेत शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि कुलगुरू डॉ. देशमुख यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली. राज्याच्या विधीमंडळातही हा प्रश्न गाजत आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत ३१ जुलैपर्यंत निकाल लावणे मुंबई विद्यापीठाला अनिवार्य बनले आहे. यासाठीच मुंबई विद्यापीठ प्रशासनाने उत्तरपत्रिका तपासण्यासाठी राज्यातील इतर विद्यापीठाकडे मदत मागितली आहे.

सुरुवातीला नागपुरच्या विद्यापीठाकडे उत्तरपत्रिका पाठविण्यात आल्या होत्या. त्यानंतर औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मुंबईच्या अधिका-यांनी धाव घेत विधि शाखेच्या ५ हजार उत्तरपत्रिका तपासून देण्याची विनंती केली. या विनंतीनुसार विद्यापीठ प्रशासनाने ऑनलाईन उत्तरपत्रिका तपासण्यासाठी विधि शाखेच्या १०० प्राध्यापकांची यादी मुंबई विद्यापीठाकडे पाठवली. तसेच उत्तरपत्रिका तपासण्यासाठी मुख्य ग्रंथालयातील संगणक उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. यास विद्यापीठातील परीक्षा विभागातील अधिका-यांनी दुजोरा दिला आहे.