शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

सिंगापूरच्या धर्तीवर मास्टर प्लॅन

By admin | Updated: July 16, 2016 01:17 IST

औरंगाबाद : सिंगापूरने मागील काही वर्षांमध्ये पाण्यावर प्रक्रिया करण्याच्या उपक्रमात बरीच आघाडी घेतली आहे. एका अमेरिकन कंपनीच्या मदतीने सिंगापूरने ही किमया केली

औरंगाबाद : सिंगापूरने मागील काही वर्षांमध्ये पाण्यावर प्रक्रिया करण्याच्या उपक्रमात बरीच आघाडी घेतली आहे. एका अमेरिकन कंपनीच्या मदतीने सिंगापूरने ही किमया केली असून, ऐतिहासिक औरंगाबादेतही पाण्याच्या पुनर्वापरासंदर्भात अमेरिकन कंपनीचीच मदत घेऊन मास्टर प्लॅन तयार करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिली.सिंगापूर येथे मागील आठवड्यात आंतरराष्ट्रीय पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेस औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया उपस्थित होते. शनिवारी परिषदेतील माहिती विशद करताना बकोरिया म्हणाले की, सिंगापूर येथील तंत्रज्ञान खूप प्रगत आहे. या तंत्रज्ञानाशी सांगड घालणे एवढे सोपे नाही. अफाट पैसा खर्च करून ते विविध योजना राबवीत असतात. पाण्याचा पुनर्वापर अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात येत आहे. अमेरिकेच्या ‘सीएचएमएल’या कंपनीने सिंगापूरमधील दूषित पाण्याचा पुनर्वापर चांगल्या पद्धतीने करून दिला आहे. कोट्यवधी रुपये यासाठी खर्च करण्यात आले आहेत. ड्रेनेजचे पाणी पिण्यायोग्य तयार करण्यात आले आहे. आम्हीसुद्धा हे पाणी पिऊन बघितले. अमेरिकन कंपनीशी आपली चर्चा झाली असून, औरंगाबादेतही नैसर्गिक पाण्याचे स्रोत खूप आहेत. पाण्याचे स्रोत बळकट करणे आणि वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मास्टर प्लॅन करण्यात येईल. सर्वेक्षण झाल्यानंतर या प्रकल्पासाठी किती खर्च येईल, त्यासाठी पैसे कसे उभे करायचे हे ठरविता येणार आहे. हर्सूल तलावासह शहरातील काही विहिरींच्या पाण्याचा वापर लवकरच सुरू करण्यात येणार आहे. शहरात ३५० विहिरी आहेत. त्यातील ९९ मनपाच्या आहेत. सीएसआर आणि मनपा निधीतून या विहिरींची बांधणी करण्यात येईल.