शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर शहरात भव्य रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:31 IST

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्यात रक्ताचा तुटवडा पडल्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे ...

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्यात रक्ताचा तुटवडा पडल्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अल फरहान मेडिकल फाउंडेशच्या वतीने दिनांक १३ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० ते रात्री १० वाजेपर्यंत युनुस कॉलनी, कटकट गेट रोड येथे सोशल डिस्टन्सिंगचे व कोरोना संदर्भाच्या नियमावलीचे पालन करुन भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यामध्ये एकूण ८७० जणांनी रक्तदान केले आहे.

अल फरहान मेडिकल फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था असून सर्वसामान्य गोरगरीब जनता व रुग्णांना आरोग्य क्षेत्रात मदत करण्याचे कार्य सतत करत असते. संस्थेच्या वतीने गेल्या आठ वर्षांपासून दरवर्षी रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. यावर्षी सुद्धा आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. यामध्ये ९८ महिलांनी रक्तदान करुन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

शिबिर यशस्वी करण्यासाठी अल फरहान मेडिकल फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी १५ दिवस अथक परिश्रम केले. लोकांमध्ये रक्तदान करण्याची जनजागृती केली. शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर्स, समाजसेवक, व नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ संदेशाद्वारे रक्तदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. शासकीय वैद्यकीय रक्तपेढी, लोकमान्य रक्तपेढी, दत्ताजी भाले रक्तपेढी यांनी रक्त संकलनाचे कार्य केले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी अल फरहान फाउंडेशनचे रियाझ काझी, निझाम सिद्दीकी, सय्यद तारेक, समी सिद्दीकी, मोहम्मद अलताफ, रईस अहेमद, खान रजी, झीशान पटेल, नासेर बास्मेह, अन्वर खान, सय्यद माजेद, अब्दुल हफीज, सय्यद अमीनोद्दीन यांच्यासह फाउंडेशनच्या इतर सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.