शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

मार्केटिंग एजंटची हत्या करुन मृतदेह फेकला रेल्वेरुळावर

By admin | Updated: January 13, 2017 16:46 IST

औरंगाबादमध्ये एका मार्केटिंग एजंटची हत्या करुन त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकल्याची घटना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 13 - हर्बल कंपनी, विमा कंपनी सारख्या अनेक कंपनींमध्ये मार्केटिंग एजंट म्हणून काम करणा-या एका तरुणाची निर्घृण हत्या करुन मारेक-यांनी त्याचा मृतदेह रेल्वेरूळावर फेकल्याची घटना समोर आली आहे. अमोल साबळे असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून सुंदरवाडी शिवारातील रेल्वेरुळावर त्याचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्याच्या हत्येची घटना उजेडात आली. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खूप कमी वेळातच अमोलला मार्केटिंग व्यवसायात चांगले यश मिळाले. 4 वर्षापूर्वी 10 लाख रुपयांची कारही त्याने खरेदी केली. कार खरेदी केल्यापासून त्याचा मित्रपरिवारही वाढला होता. व्यवसायानिमित्त तो ब-याचदा राज्याबाहेरही जात असत. महिन्यातील 10 ते 20 दिवस तो घराबाहेर रहात. दरम्यान,  गुरुवारी दुपारी तो घरातून बाहेर पडला तो परतलाच नाही.  अज्ञातांनी त्याच्या कारमध्येच धारदार शस्त्रांनी गळा चिरुन त्याची हत्या केली व त्याचा मृतदेह रेल्वेरुळावर फेकला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.