शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
3
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
4
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
5
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
6
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
7
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
9
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
10
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
11
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
12
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
13
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
14
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
15
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
16
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
17
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
18
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
19
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
20
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा

जिल्ह्यातील बाजारपेठेत शुकशुकाट!

By admin | Updated: July 16, 2014 01:26 IST

तीर्थपुरी : परिसरात काही ठिकाणी अद्यापही मोठा पाऊस झालेला नाही. जेमतेम पावसावर ज्या शेतकऱ्यांनी सरकीची लागवड केली ती पूर्णपणे धोक्यात आली आहेत.

तीर्थपुरी : तीर्थपुरीसह परिसरात काही ठिकाणी अद्यापही मोठा पाऊस झालेला नाही. जेमतेम पावसावर ज्या शेतकऱ्यांनी सरकीची लागवड केली ती पूर्णपणे धोक्यात आली आहेत. पाऊस नसल्याने आठवडी बाजार व व्यापारीपेठेत चांगलाच शुकशुकाट दिसून येत आहे.पावसाळा सुरू होऊन जवळपास ३८ दिवस झाले असले तरी अद्यापपर्यंत पेरणी करण्यासारखा पाऊस कोठेच झाला नाही. मात्र, कंडारी रामसगाव, जोगलादेवी, बानेगाव, मुरमा, कोठी, खडका आदी ठिकाणी चार दिवसांपूर्वी थोडा पाऊस झाला होता. परत पाऊस येईल, असे गणित शेतकऱ्यांनी उराशी बांधून तेथील शेतकऱ्यांनी सरकीची लागवड केली आणि पाऊस बंद झाला. त्यामुळे त्या सरक्या अद्यापपर्यंत उगल्या नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे पहात पांढरे झाले आहे. पाऊस नसल्याने शेतकरी हैराण झाल्याने तीर्थपुरी, अं. टेंभी येथील आठवडी बाजारात शुकशुकाट दिसून येत आहे. तसेच तीर्थपुरीच्या बाजारपेठेतही शुकशुकाट दिसत आहे. गारपिटीचे अनुदान अद्यापही शेतकऱ्यांची हाती पडलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गाठीलाही पैसा नाही. परिणामी अनेक गावातील आठवडी बाजारांत शांतता आहे. आर्थिक उलाढाल कमालीची मंदावली आहे. पाऊस नसल्याने आठवडी बाजारात तुरळक होत असल्याने व्यापारी वर्गही हवालदिल झाला आहे. घनसावंगी तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून दिवसभर ढगाळ वातावरण असते. प्रत्यक्षात पाऊस मात्र पडत नाही. तीर्थपुरीचा काही भागात जायकवाडीच्या डाव्या कालव्यामुळे सुजलाम सुफलाम बनला खरा. परंतु कालव्यातही थेंबभर पाणी नसल्याने हरितपट्टा रुक्ष होतो की काय असा गंभीर सवाल शेतकरी, ग्रामस्थ तसेच व्यापारी वर्गातून उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)अर्धा भोकरदन तालुका अद्यापही कोरडाठाकपारध : भोकरदन तालुक्यात केवळ काही गावातच बुधवारचा पाऊस झाला. दानापूरपासून पारधपर्यंतच्या गावात थेंबभरही पाऊस पडला नसल्याने शेतकरी हवालदिल झाले.बुधवारी पाच वाजेपासून भोकरदनसह परिसरात ते दानापूरपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, दानापूरपासून पारध दरम्यान, कोठेच पाऊस झाला नाही. पारध परिसरात काही प्रमाणात मिरची व कपाशी वगळता कोणतीच पेरणी पावसाअभावी झालेली नाही. शेतकऱ्यांनी महागा मोलाची बियाणे घरात आणून ठेवलेली आहेत. शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पहात आहेत. मात्र जो दिवस उगवतो तो सारखाच केव्हा तरी दिवसातून एखाद्या वेळेस आकाशात ढग दाटून येतात व क्षणात कडक ऊन पडते. पावसाचा थेंब पडत नाही. जुलै महिना अर्ध्यावर येवून ठेपला. सोयाबीन, कपाशी, उडीद, मूग, पेरणीचा कालावधी संपून गेला आता पाऊस पडला तरी नेमके कोणते पीक घ्यावे, असा प्रश्न पारध परिसरातील शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.बऱ्याच शेतकऱ्यांनी बँकांकडून पीककर्ज घेऊन बियाणे, खत, औषधी खरेदी करून ठेवली आहे. पाऊस पडलाच नाही तर उत्पादन कसे काढणार व घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करणार असाही प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.काही शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनच्या आधारावर कपाशी व मिरची लावलेली आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून विहिरीतील पाणी पातळी खालावली असल्यामुळे ही पिकेही उगवणे अवघड झाले आहे. एकंदर पारध परिसरावर दुष्काळाचे संकट घोंगावत असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे.भारज : गेल्या वर्षीच्या कडू आठवणी डोळ्याआड टाकून पुन्हा एकदा बळीराजा पेरणी तसेच लागवड करण्यास जुंपला आहे. भारज परिसरात पेरणीयोग्य पाहिजे तसा अद्यापही पाऊस झाला नाही. मात्र, पावसाळा सुरू होऊन दीड महिना संपला. थोड्या फार पावसाच्या भरवशावर अखेर पेरणी सुरू करावीच लागली. वेळ निघून जात असल्याने हातावर हात देऊन बसणे कसे जमणार अशा विवंचनेत अखेर जेमतेम पावसावर शेतकरी पेरणीकडे वळाला आहे. भारज परिसरात सोयाबीन, मका, कपाशी, भाजीपाला अशी प्रमुख पिके घेतली जातात. मागील हंगामात उत्पादन कमी आणि मालाला बाजारभावही कमी मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले. यामुळे या हंगामावर मोठी आशा होती. मात्र, सुरुवातीलाच निसर्गाच्या अवकृपेने पाऊस लांबला आणि उशिरा पेरण्या सुरू झाल्या तरी चांगला पाऊस होऊन उत्पादन हाती येईल, या अपेक्षेने पुन्हा धरणी मातेच्या उदरात धान्य पेरण्याला सुरूवात केली. समाधानकारक पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करण्याची वेळ येणार आहे.कृषी सहायक गावाकडे फिरकेना, मार्गदर्शनाची गरजवाटूर फाटा : महिनाभर दडी मारलेल्या पावसाने जुलै महिन्यात येण्यास सुरूवात केली. परंतु ठिबक सिंचनावर लागवड केलेल्या शेतकऱ्यांना कपाशीविषयक मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे. परंतु काही शेतकरी कोणते औषध आणावे, कोणते खत द्यावे, याविषयी संभ्रमात असल्याचे समजते. तसेच फळबाग, ऊस या शेतकऱ्यांना देखील मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. अनेक कृषी सहायक गावात फिरकत नसल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. फळबागांमध्ये या परिसरामध्ये मोसंबी बागा आता फुलोऱ्यात आहेत. मोसंबी उत्पादकांना विशेष शिबीर घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे. काही शेतकऱ्यांना तर आपल्या गावासाठी कोणते कृषी सहायक आहेत आणि ते कोठे असतात हे सुद्धा माहीत नाही. एकूणच कृषी विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. गारपिटीचे पंचनामेही थातूरमातूरच करण्यात आले. काही शेतकऱ्यांना अनुदान मिळोले तर काही जण अद्यापही वंचित आहेत. गारपिटीचे अनुदान तात्काळ अनुदान देण्याची मागणी होत आहे.