शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती सभापतीपदी राजेश इंगोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:31 IST

वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राजेश पाटील इंगोले यांची तर उपसभापतीपदी अशोक अडकिणे यांची बिनविरोध निवड झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राजेश पाटील इंगोले यांची तर उपसभापतीपदी अशोक अडकिणे यांची बिनविरोध निवड झाली. २३ आॅगस्ट रोजी झालेल्या विशेष सभेस १८ पैकी १४ संचालक उपस्थित होते. अविश्वास ठरावाच्या वेळी झालेल्या तणावाच्या एकदम विपरित अत्यंत शांततेत निवड पार पडली.वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती राष्टÑवादीच्या ताब्यात होती. सभापतीपदी राजू पाटील नवघरे व उपसभापती तानाजी पाटील बेंडे हे दोघे विराजमान होते. मात्र या दोघांच्या विरोधात राष्टÑवादीच्याच संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला. त्यास शिवसेनेनेही पाठिंबा दिला.या अविश्वास प्रकरणाने तालुक्याच्या राजकारणात प्रचंड वादळ उठले होते. कार्यकर्त्यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केला होत्या; परंतु ठराव पास झाला होता. त्या पार्श्वभूमीवर नवीन पदाधिकारी निवडण्यासाठी २३ रोजी वसमत येथे विशेष सभा बोलावण्यात आली होती. पीठासीन अधिकारी म्हणून सहा. उपनिबंधक के.बी.फिसके, बाजार समितीचे सचिव एस.एन.शिंदे यांची उपस्थिती होती. सभागृहात १८ पैकी १४ संचालक हजर राहीले. राष्टÑवादीचे चार संचालक गैरहजर राहीले. सभापतीपदासाठी राष्टÑवादीचे राजेश पाटील इंगोले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. उपसभापती पदासाठीही अशोकराव अडकिणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. दोघांचीही बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर कार्यकर्ते व समर्थकांनी जल्लोष केला.सभापती राजेश इंगोले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राष्टÑवादीचेच सभापती उपसभापती पुन्हा निवडल्या गेल्याचे त्यांनी सांगितले. बाजार समितीचा विकास व शेतकºयांच्या हितासाठी आम्ही काम करणार असल्याचे ते म्हणाले.