शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

कदमांवर सोपविली मराठवाड्याची धुरा

By admin | Updated: January 4, 2016 00:21 IST

औरंगाबाद : दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी

औरंगाबाद : दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून उपक्रम राबविण्याची जबाबदारी पक्षाने औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडे सोपविली आहे. पालकमंत्री कदम यांनीच औरंगाबादेत रविवारी ही माहिती दिली. विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पहिल्यांदाच रामदास कदम शनिवारी औरंगाबादेत आले होते. खा. चंद्रकांत खैरे यांच्या मुलीच्या लग्नासाठी ते औरंगाबादेत आले होते. घरचे लग्न आहे, म्हणून खास एक दिवस अगोदरच आलो असेही कदम म्हणाले. मी औरंगाबादचा पालकमंत्री असलो तरी आता माझ्यावर मराठवाड्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यामुळे विभागातील सर्वच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी झोकून देऊन काम करणार आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारी पातळीवरून काम सुरूच आहे. तरीही शासन जिथे कमी, तिथे आम्ही या पद्धतीने शिवसेना शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र काम करत आहे. पक्षाच्या वतीने प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मदत देण्याचे काम केले जाणार आहे.