शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

अनेक प्रकल्प अक्षरश: कोरडेच

By admin | Updated: November 18, 2014 01:08 IST

औरंगाबाद : मराठवाड्यावर पावसाने यंदा अवकृपा केली आहे. विभागात वार्षिक सरासरीच्या ५३ टक्केच पाऊस झाला आहे, त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यावर पावसाने यंदा अवकृपा केली आहे. विभागात वार्षिक सरासरीच्या ५३ टक्केच पाऊस झाला आहे, त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. पावसाअभावी खरिपाची पिके हातची गेली आहेत. पावसाळा संपला तरी अनेक प्रकल्प अक्षरश: कोरडेच राहिले आहेत, तर उर्वरित प्रकल्पांमध्येही जेमतेम साठा झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठवाड्यातील पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर होणार आहे. मराठवाड्यात सर्व प्रकारचे एकूण ८३३ प्रकल्प असून, त्यांच्या पाणीसाठ्याची क्षमता ७९११ द.ल.घ.मी. आहे; मात्र सध्या या प्रकल्पांमध्ये ३४ टक्के म्हणजे २६७३ द.ल.घ.मी. इतकाच पाणीसाठा आहे. लघु, मध्यम, मोठे, तसेच मांजरा आणि गोदावरी नदीवरील बंधारे या सर्वांमध्ये जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे. ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी ३९ टक्के साठा आहे. यातील मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात ३१ टक्के पाणीसाठा आहे, तर मांजरा, निम्न तेरणा आणि सिना कोळेगाव हे तीन प्रकल्प कोरडेच आहेत. माजलगाव प्रकल्पातही अवघा २ टक्के साठा शिल्लक आहे. येलदरी धरणात ५० टक्के, विष्णुपुरी धरणात ६७ टक्के आणि सिद्धेश्वर धरणात ३५ टक्के पाणीसाठा आहे. विभागातील ७५ मध्यम प्रकल्पांमध्येही २८ टक्केच साठा आहे. परभणी जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये सर्वात कमी १९ टक्के, तर नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सर्वाधिक ४२ टक्के इतका जलसाठा आहे. यंदा मराठवाड्यातील ७२० लघु प्रकल्पांमध्येही जेमतेम २८ टक्के साठा होऊ शकला आहे.