शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेत अनेकांना लागली लॉटरी

By admin | Updated: September 4, 2014 00:54 IST

औरंगाबाद : महापालिकेत आज अनेक निलंबित, रजेवर असलेल्या अधिकाऱ्यांची लॉटरी लागली आहे. पदभार सोडण्यापूर्वी डॉ.कांबळे यांनी कुणालाही नाराज केले नाही.

औरंगाबाद : महापालिकेत आज अनेक निलंबित, रजेवर असलेल्या अधिकाऱ्यांची लॉटरी लागली आहे. पदभार सोडण्यापूर्वी डॉ.कांबळे यांनी कुणालाही नाराज केले नाही. लेखा विभागातील काही पदांव्यतिरिक्त त्यांनी चार ते पाच पदांबाबत महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे कळते. आयुक्त महाजन यांना पदभार दिल्यानंतर मुंबईला जाण्यासाठी डॉ.कांबळे बंगल्यावर येताच त्यांच्या मागेच सभागृह नेते किशोर नागरे यांच्यासह काही नगरसेवक आले, तसेच उपअभियंता शिरीष रामटेके हे देखील काही महत्त्वाच्या संचिका घेऊन आले. आयुक्तांचे स्वीय सहायक हनुमानदास बाहेती, सुरेश ढेंगळे हे देखील बंगल्यावर होते. १३ सप्टेंबर रोजी डॉ.कांबळे निवासस्थान रिक्त करून देण्यासाठी येणार आहेत. तोपर्यंत नवनियुक्त आयुक्त महाजन हे देखील धुळ्याहून सहकुटुंब परततील. अनेकांना दिले प्रमोशनडॉ.कांबळे यांनी पदभार सोडण्यापूर्वी अनेकांना प्रमोशन दिले. यामध्ये जयंत खरवडकर यांच्याकडे गुंठेवारी कक्षप्रमुख, आर.एन.संधा यांना भोगवटा कक्षप्रमुख, तर डॉ.जयश्री कुलकर्णी यांच्याकडे आरोग्य अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर निलंबित इमारत निरीक्षक सारंग विधाते यांचे निलंबन मागे घेतल्याची चर्चा आहे. शिरीष रामटेके, पी.आर.बनसोडे यांना कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नत केल्याची चर्चा आहे. डॉ.कुलकर्णी यांना पुन्हा आरोग्य अधिकारी या पदावर कायम केले आहे. या प्रकरणात चार सदस्यीय समितीही गठित करण्यात आली आहे. बदल्यांमुळे चर्चेततत्कालीन आयुक्त डॉ. भापकर हे कर्मचारी, अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्यावरून चर्चेत राहिले, तर डॉ. कांबळे हे प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून चर्चेत राहिले. ते ज्या-ज्या वेळी मुंबई, दिल्लीला प्रशासकीय बैठकीनिमित्त जात, त्या-त्या वेळी अनेक विभागात खांदेपालट करीत असत.