शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयच्या अनेक विद्यार्थ्यांना शून्य मार्क !

By admin | Updated: January 20, 2017 00:16 IST

लातूर : जेरी पाठविण्यात तांत्रिक गडबड झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेत शून्य मार्क मिळाले आहेत

लातूर : लातूर शहरासह जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून परीक्षेपूर्वी आॅनलाईन अटेन्डन्स पाठविली जाते. ही हजेरी पाठविण्यात तांत्रिक गडबड झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेत शून्य मार्क मिळाले आहेत. परिणामी, शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती विद्यार्थ्यांना आहे. दरम्यान, राज्य कार्यालय आणि दिल्ली येथील कार्यालयाकडे हजेरी दुरुस्ती करण्यासाठी लातूर आयटीआयमधून काही कर्मचारी गेले असल्याचे समजते. लातूर जिल्ह्यात लातूर, उदगीर, निलंगा, औसा, जळकोट, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, चाकूर, अहमदपूर या दहाही तालुक्यांच्या ठिकाणी आयटीआय महाविद्यालये आहेत. चार सेमिस्टरचे अनेक शैक्षणिक कोर्स या महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांना शिकविले जातात. लातूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ५५० विद्यार्थ्यांचा विविध कोर्सेसला प्रवेश आहे. परीक्षेपूर्वी आॅनलाईन पद्धतीने राज्य कार्यालयाकडे हजेरी पाठविली जाते. पहिल्या सेमिस्टरची हजेरी पाठविताना दुसऱ्या सेमिस्टरची हजेरी राहिली, तर सॉफ्टवेअरमध्ये ती अपलोड होत नाही. असाच तांत्रिक घोळ विद्यार्थ्यांच्या अटेन्डन्समध्ये झाला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या निकाल पत्रावर ‘शून्य’ मार्क आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी धास्तावले असून, त्यांनी प्राचार्यांकडे धाव घेतली आहे. दरम्यान, प्राचार्यांनी राज्य कार्यालयाकडे संपर्क साधला असून, दुरुस्तीची मागणी केली आहे. ४ जानेवारीला या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल लागला असून, १४ जानेवारीपर्यंत परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत आहे. या मुदतीत निकाल न आल्याने विद्यार्थ्यांना परत परीक्षा फॉर्म भरावा लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी धास्तावले आहेत.(प्रतिनिधी)