शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

अनेकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग

By admin | Updated: June 12, 2014 01:40 IST

फकिरा देशमुख , भोकरदन लोकसभा निवडणुकीनंतर भोकरदन विधानसभा मतदारसंघासाठी भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे चित्र आहे.

फकिरा देशमुख , भोकरदनलोकसभा निवडणुकीनंतर भोकरदन विधानसभा मतदारसंघासाठी भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे चित्र आहे.लोकसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या विरोधात २८ हजार २३८ हजाराचे मताधिक्यामुळे ही निवडणूक मोठी अवघड वाटत असली तरी घराणेशाहीचा मुद्याने जोर धरला तर मात्र चांगलीच चुरशीची होईल. भोकरदन विधानसभा मतदार संघातून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून विद्यमान आ़ चंद्रकांत दानवे हे प्रमुख उमेदवार आहेत. भाजपाकडून रामेश्वरचे चेअरमन संतोष दानवे हे उमेदवार असण्याची शक्यता आहे. शिवाय माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जि़प़चे माजी सभापती राजेश चव्हाण, मनीष श्रीवास्तव, सर्जेराव शिंदे हे इच्छुक आहेत. भाजपाकडून बाजार समितीचे माजी सभापती शिवाजीराव थोटे, जि़प़चे माजी सभापती रमेश गव्हाड, बाजार समीतीचे सभापती अरूण वाघ हे इच्छुक असल्याचे समजते.काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव दळवीसुध्दा सर्व ताकदीनिशी उतरणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे केशव पाटील जंजाळ हेसुध्दा एक तरुण उमेदवार इच्छुक आहेत. ही जागा आघाडीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असल्याने आ़ चंद्रकांत दानवे हेच उमेदवार असतील. लोकसभा निवडणुकीत खा़ रावसाहेब दानवे चौथ्यांदा विजयी झाले. रावसाहेब दानवे यांच्या रूपाने मतदारसंघाला पहिल्यांदा केंद्रात राज्यमंत्रीपद मिळाले. त्यामुळे भोकरदन विधानसभा मतदारसंघात दानवे सांगतील तोच उमेदवार असेल. तरीसुध्दा सर्वांना विश्वासात घेऊन ते संतोष दानवे यांचा पत्ता पुढे करतील. या मतदारसंघात मनसेची ताकद वाढलेली आहे. मनसेकडून जिल्हाध्यक्ष सांडूअण्णा पुंगळे, रावसाहेब भवर , दिलीप वाघ, हे इच्छुक आहेत. समाजावादी पक्ष व बसपा यांच्याकडून या मतदारसंघात उमेदवार शोधण्याचे काम सुरू आहे़ भोकरदन - जाफराबाद तालुक्यात आजही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.या भागातील रस्त्यांची झालेली दयनीय आवस्था रावसाहेब दानवे व चद्रकांत दानवे यांच्यासाठी सन्मानाची बाब नाही. दरम्यान, गुत्तेदारीत लोकप्रतिनिधींचे नातेवाईक तसेच कार्यकर्तेच असल्यामुळे या भागातील रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाली. नवीन रस्ता सुध्दा एक वर्षात उखडल्याचे अनेक उदहरणे आहेत़ मतदारसंघातील मतदाराना रावसाहेब दानवे व चंद्रकांत दानवे यांच्याकडून विकासाच्या खूप अपेक्षा आहेत़राष्ट्रवादीचंद्रकांत दानवे६७,४८०भाजपानिर्मला दानवे६५,८४१अपक्ष सर्जेराव शिंदे११,१६३इच्छुकांचे नाव पक्षचंद्रकांत दानवे राष्ट्रवादीराजेश चव्हाणराष्ट्रवादी काँग्रेसराजाभाऊ देशमुखराष्ट्रवादी काँग्रेससर्जेराव शिंदेराष्ट्रवादी काँग्रेससंतोष दानवेभाजपाशिवाजीराव थोटेभाजपारमेश गव्हाडभाजपाअरूण वाघभाजपासांडूअण्णा पुंगळेमनसेरावसाहेब भवरमनसेदिलीप वाघमनसेलक्ष्मणराव दळवीअपक्ष