शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

पैठणच्या मतदार यादीत अनेक बोगस नावे

By admin | Updated: October 19, 2016 01:08 IST

संजय जाधव , पैठण नगर परिषद पैठण निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीत बाहेर गावातील मतदारांची नावे आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

संजय जाधव , पैठणनगर परिषद पैठण निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीत बाहेर गावातील मतदारांची नावे आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, जी नावे पैठण मतदार यादीत नव्याने समाविष्ट करण्यात आली, अशा मतदारांची नावे त्यांच्या मूळ गावातील मतदार यादीत कायम आहेत. या वरून मतदार यादीत नावे समाविष्ट करताना निवडणूक विभागाने कुठलीही खातरजमा केलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशी नावे वगळण्यात यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार देऊन करण्यात आली आहे. याबाबत आयोग काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.पैठण नगर परिषद निवडणूक दि. १८ डिसेंबर २०१६ ला होत आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी यांनी प्रारूप मतदार यादी १० आॅक्टोबर रोजी प्रसिध्द केली. या यादीत अनेक प्रभागात अनोळखी नावे समाविष्ट करण्यात आल्याचे या यादीचे अवलोकन केल्यानंतर समोर आले. या मुळे या प्रभागातून निवडणूक लढणाऱ्या इच्छुक उमेदवारांना मोठा झटका बसला. अनेक इच्छुक उमेदवारांनी मतदार यादीत नावे आलेल्या मतदारांचा शोध घेतला, परंतु हे मतदार त्यांना कुठेच मिळून आले नाही. वास्तविक हे मतदार शहरात राहात नसल्याचे स्पष्ट झाले.याबाबत नगरसेवक अप्पासाहेब गायकवाड यांनी मुख्य निवडणूक आयुक्त मुंबई, निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार, मुख्याधिकारी नगर परिषद पैठण, यांना निवेदन देऊन ही नावे वगळण्यात यावी, अशी लेखी तक्रार केली आहे. या तक्रारी सोबत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या मतदारांची पैठण शहरात व इतर गावात अशा दोन्ही मतदार यादीत नाव असलेली यादी दोन्ही ओळखपत्र क्रमांकासह सादर केली आहे.जाणीवपूर्वक नोंदणीनिवडणूक जिंकण्यासाठी जाणीवपूर्वक बीएलओ यांना हाताशी धरून काही जणांनी मतदार यादीत ही नावे समाविष्ट करण्यात आल्याची शहरात चर्चा होत आहे. आज प्रभाग क्रमांक सात मध्ये जवळपास १०० बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. या बोगस मतदारांमुळे या प्रभागातील मतदारांच्या निवड क्षमतेवर अन्याय होणार आहे अशी भावना या प्रभागातील नागरिक व्यक्त करीत आहेत.पैठण शहर मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या यादीत आडूळ, विहामांडवा, पाचोड, बिडकीन व इतर गावातील मतदार यादीतील नावे समाविष्ट करण्यात आल्याचे उघड झाले आहे. वास्तविक पाहता मतदार यादीत नावे समाविष्ट करताना बी.एल. ओ. ने सदरील मतदारांचा निवासाचा पुरावा घेतल्यानंतरच अशी नावे समाविष्ट करता येतात. परंतु येथे नव्याने नाव समाविष्ट करताना बी.एल.ओ. यांनी याबाबत दक्षता घेतली नसल्याचे दिसून आले आहे.