शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

२ हजार अंत्यविधीच्या सरणाचे पैसे मनपाने थकविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:04 IST

औरंगाबाद : दीड वर्षांत कोरोना संसर्गाने मृत्युमुखी पडलेल्या सुमारे दोन हजार मृतदेहांवर महापालिकेतर्फे अंत्यसंस्कार करण्यात आले. यासाठी स्मशानजोग्यांनी ...

औरंगाबाद : दीड वर्षांत कोरोना संसर्गाने मृत्युमुखी पडलेल्या सुमारे दोन हजार मृतदेहांवर महापालिकेतर्फे अंत्यसंस्कार करण्यात आले. यासाठी स्मशानजोग्यांनी तब्बल ५० लाख रुपयांची उधार, उसणवारी करून सरणाची लाकडे आणली. या सरणाचा खर्च व स्मशानजोगींचे चार महिन्यांचे वेतनही मनपाने थकविले आहे.

मनपा एका मोफत अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा खर्च म्हणून स्मशानजोगींना अडीच हजार रुपये देते. मात्र ही रक्कम वेळेत मिळत नसल्याने स्मशानाजोगी त्रस्त आहेत.

कोरोना काळात मृतदेहांवर केलेल्या अंत्यसंस्काराचे पैसे मिळत नसल्याने स्मशानजोगींनी पालिकेत येऊन संताप केला. पुष्पनगरी स्मशानभूमीचे स्मशानजोगी गोविंद गायकवाड यांनी सांगितले की, चार महिन्यांतील लाकडाचे पैसे आणि वेतन नसल्यामुळे आम्ही आर्थिक अडचणीत सापडलो आहोत. पुष्पनगरी स्मशानभूमीत एका हजारांपेक्षा अधिक मृतदेहांवर चार महिन्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकट्या पुष्पनगरी स्मशानभूमीचे सरणाचे २५ लाख रुपये थकले आहेत.

संस्था आणि स्मशानजोगी फ्रंटवर्कर

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत शहरात दोन हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. पालिकेने नेमलेल्या स्वयंसेवी संस्था, स्मशानजोग्यांनी मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. अनेकदा नातेवाईक अंत्यसंस्काराला येत नसत, त्या परिस्थितीत संस्था आणि स्मशानजोगींनी शहरातील ४० स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. मुकुंदवाडी, पुष्पनगरी, सेंट्रल नाका, प्रतापनगर, बेगमपुरा, आंबेडकरनगर आणि कैलासनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याशिवाय पाच दफनभूमीतही अंत्यसंस्कार करण्यात आले.