अंबाजोगाई: मांजरा नदीवरील देवळा, अंजनपूर येथील बॅरेज मधून पाणी सोडण्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँगेसच्यावतीने देवळा येथील येथील नदिच्या पुलावर मंगळवारी रास्तारोका आंदोलन करण्यात आले़ राकाँ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या मार्गशर्दनाखाली हे आंदोलन कार्यकर्त्यांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता़ चार बॅरेजमधील पाणी रोतोरात लातूरकडे, ‘अंबाजोगाईचे पाणी पळविले’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने हे वृत्त १७ नोव्हेंबर रोजी प्रकाशीत केले होते़ यामुळे शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली व राकाँ कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मंगळवारी आंदोलन केले़ सकाळी १० वाजता मांजरा नदीच्या पुलावर रास्ता रोको करण्यात आला, यामुळे वाहतूक ठप्प झाली होती़ आंदोलनात प्रभाकर सगट, पंढरी यादव, श्रीकांत पवार, नानासाहेब शेळके, सुर्यकांत पवार, रावसाहेब भिसे, अमर देशमुख, बालासाहेब देशमुख यांची भाषणे झाली़ यावेळी केज विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष विलास सोनवणे, राकाँ तालुकाध्यक्ष मदन यययदव, सुरेश जगताप, फुलचंद देशमुख यांच्यासह पंचक्रोशितील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ (वार्ताहर)
‘मांजरा’चे पाणी पेटले
By admin | Updated: November 19, 2014 00:59 IST