शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सुरेल मैफलीचा सखींनी लुटला मनमुराद आनंद

By admin | Updated: April 26, 2016 00:11 IST

पैठण : मराठी-हिंदीतील नव्या व जुन्या अवीट गोडीच्या गाण्यांच्या सूरमयी मैफलीने पैठण विभागातील सखी शनिवारी हरखून गेल्या.

पैठण : मराठी-हिंदीतील नव्या व जुन्या अवीट गोडीच्या गाण्यांच्या सूरमयी मैफलीने पैठण विभागातील सखी शनिवारी हरखून गेल्या. खास महिलांसाठीच्या पैठणमधील ‘सखी जल्लोष-२०१६’ या पहिल्याच मैफलीला सखींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मनोरंजनाचा उत्स्फूर्त आनंद लुटला. पैठण विभागात लोकमत सखी मंच सदस्य नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर शनिवारी (दि.२३) सखी मंच सदस्यांसाठी येथील पीतांबरी मंगल कार्यालयात सायंकाळी या अविस्मरणीय मैफ लीस प्रारंभ झाला. या आनंदोत्सवात महिलांनी अनेकदा ठेकाही धरला. आलाप ग्रुपचे अभिजित शिंदे व सरला शिंदे यांच्यासह निशांत घाटे यांनी उपस्थित श्रोत्यांवर आवाजाची मोहिनीच घातली. गणरायाला नमन करून प्रारंभ झालेल्या या मैफलीत गाजलेली हिंदी- मराठीतील जुनी व नवी गीते धूमधडाक्यात सादर झाली. उत्तरोत्तर या मैफलीची रंगत वाढतच गेली. येथील मनपसंत कलेक्शनतर्फे खास सखीसाठी लकी ड्रॉचे आयोजन केले होते. त्यात सविता दिगंबर वडेकर या भाग्यवान विजेत्या ठरल्या. यावेळी मंचावर नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, उपनगराध्यक्ष रेखा कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी बच्चनसिंह, नगरसेवक अप्पासाहेब गायकवाड, सतीश पल्लोड, पोलीस निरीक्षक अशोक गिरी आदींची प्रमुख उपस्थिती होती. पैठणमध्ये आयोजित या मैफलीची व्यवस्था सखी मंचच्या पदाधिकारी अपर्णा गोर्डे, वैशाली विनोद लोहिया, ज्योती काकडे, अश्विनी लखमले, संगीता खरे, अनिता जाधव, सुवर्णा रासने, कीर्ती भाकरे, मंगल मगर यांनी चोख बजावली. महिलांना आपले कलागुण सादर करण्यासह व्यक्त होण्यासाठी सखी मंच हे हक्काचे व्यासपीठ. मनोरंजनासह व्यक्तिमत्त्व विकासाचे महाद्वार खुले करणाऱ्या सखी मंचचे सदस्य झालेल्या महिलांना वर्षभर दर्जेदार कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी यानिमित्ताने मिळाली आहे.