शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

केलेले काम व खर्चाचा निधी सार्वजनिक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2017 00:17 IST

कंपनीला होणाऱ्या लाभाचा काही भाग सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कामावर खर्च करणे,

अविनाश चमकुरे । लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड: नागरिकांना निर्भेळ खाद्यपदार्थ उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची आहे़ मात्र रिक्त पदांची लागण झालेल्या या विभागाचा भार सद्य:स्थितीत फक्त दोन अधिकाऱ्यांवर असल्याने जिल्ह्यातील ३३ लाख नागरिकांची अन्नसुरक्षा धोक्यात आली आहे़ ग्राहकांना सुरक्षित अन्न व भेसळविरहित खाद्यपदार्थ उपलब्ध करुन देण्यासाठी विविध आस्थापनांची तपासणी, खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या आस्थापनांना परवाना वितरण, परवाना नूतनीकरण, सणासुदीच्या काळात मिठाईघरांची तपासणी, पॅकेज््ड ड्रिकींग वॉटर दर्जा तपासणी, गुटखाबंदी, जिल्ह्यात येणारे महत्त्वाचे व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या जेवणाचे नमुने तपासणी, न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणांची सुनावणी व पाठपुरावा यासह विविध प्रकारची कामे या विभागास करावी लागतात़ नांदेड जिल्ह्याचा विस्तार लक्षात घेता किनवट तालुका दीडशे किलोमीटर अंतरावर आहे़ शेजारील हिंगोली, परभणी व लातूर जिल्ह्याचे अंतर ८० ते १४० किलोमीटर असताना नांदेड जिल्ह्याचे शेवटचे टोक पावणेदोनशे किलोमीटर अंतरावर आहे़ अन्न व औषध प्रशासन विभागाचे नांदेड येथे जिल्हा कार्यालय आहे़ कार्यालय एकत्र असले तरी अन्न व औषध विभागाचे कामकाज स्वतंत्ररीत्या चालते़ अन्न विभागासाठी सहायक आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली पाच अन्नसुरक्षा अधिकारी व दोन नमुना सहायकांची पदे मंजूर आहेत़ येथील सहायक आयुक्त पी़ डी़ गळाकाटू यांची बदली लातूरला झाल्याने हे पद रिक्त झाले असून तात्पुरता पदभार परभणीचे सहायक आयुक्त के़आऱ जयपूरकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे़ त्यामुळे परभणी, हिंंगोली, जालना व नांदेड अशा चार जिल्ह्यांचा पदभार जयपूरकर यांच्याकडे आहे़ कारवाईच्या धडाक्याने वेगळी प्रतिमा निर्माण केलेले अन्नसुरक्षा अधिकारी प्रवीण काळे यांची बदली दीड वर्षांपूर्वी यवतमाळ येथे झाली़ तेव्हापासून त्यांचे पद रिक्तच आहे़ तसेच अन्नसुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड व संजय चट्टे यांची बदली महिनाभरापूर्वी अनुक्रमे परभणी व जालना येथे झाल्याने त्यांचेही पद रिक्तच आहे़ सद्य:स्थितीत सचिन केदारे व कावळे या दोन अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांवर सबंध जिल्ह्याची अन्नसुरक्षा अवलंबून आहे़ कार्यालयातील कामकाज, परवाना तपासणी, नूतनीकरण, धाडीच्या नोंदी व कारवाई आदी कामांचा भार त्यांच्यावर आहे़ उर्वरित तीन पदे सध्यातरी रिक्तच आहेत़