शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

भूमिगतच्या कामांची सखोल चौकशी करा

By admin | Updated: June 13, 2017 01:05 IST

औरंगाबाद : भूमिगत गटार योजनेच्या कामांमध्ये प्रचंड अनियमितता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भूमिगत गटार योजनेच्या कामांमध्ये प्रचंड अनियमितता आहे. या कामांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आपण राज्य आणि केंद्र शासनाकडे करणार असल्याचे खा. चंद्रकांत खैरे यांनी जाहीर केले. सोमवारी सकाळी त्यांनी शहरातील विविध भागांत जाऊन भूमिगत गटार योजनेच्या संपूर्ण कामांची पाहणी केली.कांचनवाडी येथील एसटीपी प्लांटचे काम वगळता भूमिगत गटार योजनेची सर्व कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडे आपण चौकशीची मागणी करणार असल्याचे केंद्राच्या नगर विकास मंत्रालयाचे दक्षता व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.रोजाबाग येथून त्यांनी कामाच्या पाहणीस सुरुवात केली. तेथून बजरंग चौक, दशमेशनगर, गजानननगर, पुंडलिकनगर, मयूरबन कॉलनी, वेदांतनगर, बन्सीलालनगरमार्गे कांचनवाडी येथील कामांची पाहणी केली. नाल्यातील ड्रेनेज लाइन, मेन होल्स (चेंबर्स), मुख्य ड्रेनेज लाइनला जोडणाऱ्या अपुऱ्या ड्रेनेज लाइनची पाहणी त्यांनी केली. यावेळी उपमहापौर स्मिता घोगरे, गटनेते मकरंद कुलकर्णी, नगरसेवक राजू वैद्य, विकास जैन, सिद्धांत शिरसाट, आयुक्त डी. एम. मुगळीकर, कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी, कंत्राटदाराचे प्रतिनिधी घोसाल, साजीद, तसेच पीएमसीचे समीर जोशी उपस्थित होते.सर्वत्र भोंगळ कारभारमुख्य ड्रेनेज लाइनचे पाईप निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आले. कुठे छोटे, तर कुठे मोठे पाईप वापरण्यात आल्याने जोडण्याचे काम अतिशय अशक्यप्राय आहे. ड्रेनेज लाइन उंचीवर, तर काही भागांत अत्यंत खोल टाकण्यात आल्या आहेत. चेंबर्स आणि मेनहोल नाल्यातून वाहून येणाऱ्या कचऱ्यामुळे तुडुंब भरलेले आहेत. कुठेही मुख्य ड्रेनेज लाइनला ड्रेनेज लाइन जोडलेल्या नाहीत. जिथे ड्रेनेज लाइन टाकल्या आहेत त्या नाल्यांमधून आजही घाण पाणी वाहत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेने ड्रेनेज लाइन कशासाठी टाकल्या आहेत, हे पाहणीनंतर दिसून आले.