शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानकावर सरकता जिना बसविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 23:53 IST

परभणी रेल्वे स्थानकावर वयोवृद्ध व अपंग प्रवाशांसाठी लवकरच सरकता जीना बसविला जाईल, असे आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले असल्याची माहिती खा.बंडू जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी रेल्वे स्थानकावर वयोवृद्ध व अपंग प्रवाशांसाठी लवकरच सरकता जीना बसविला जाईल, असे आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले असल्याची माहिती खा.बंडू जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.या संदर्भात माहिती देताना खा.बंडू जाधव म्हणाले की, मराठवाड्यातील रेल्वेच्या अनेक समस्या आहेत. या समस्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कानावर घालण्यासाठी शुक्रवारी नवी दिल्ली येथे त्यांची भेट घेतली. यावेळी प्रभू यांना परभणी रेल्वे स्थानकावर अपंग व वयोवृद्ध प्रवाशांसाठी लिफ्ट व सरकता जीना बसविण्यात यावा, नांदेड- पनवेल या रेल्वेला गंगाखेड येथे थांबा देण्यात यावा, परभणी, हिंगोली, नांदेड येथील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी आणखी एक नवीन रेल्वेगाडी सुरु करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी रेल्वेमंत्री प्रभू यांनी परभणी रेल्वे स्थानकावर लिफ्ट व सरकता जिना तातडीने बसविण्यात येईल. तसेच नांदेड- पनवेल रेल्वेला गंगाखेड येथे थांबा देण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले. यावेळी मराठवाड्यातील रेल्वे स्टेशनच्या बाहेरील अतिक्रमणे हटवून त्या ठिकाणी दुकाने उभारुन ती किरायाणे दिल्यास रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होईल, हा मुद्दाही चर्चिला गेला. तसेच रेल्वेमधील खाद्यपदार्थ व पाणी विक्री अनधिकृतरीत्या होत असून त्याबाबत अधिकृत परवानगी दिल्यासही रेल्वेच्या उत्पन्नात भर पडेल, असाही मुद्दा मांडण्यात आला. अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना रेल्वे प्रवासात सूट दिली जाते. परंतु, आरक्षणात कोटा दिलेला नाही. त्यामुळे पत्रकारांसाठी आरक्षण कोटाही लागू करावा, अशीही मागणी यावेळी खा. जाधव यांनी केली. तसेच या व्यतिरिक्त मराठवाड्यातील रेल्वेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. त्यावर प्रभू यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे खा. जाधव यांनी सांगितले. यावेळी खा.श्रीरंग बारणे, खा.विनायक राऊत, खा.श्रीकांत शिंदे आदींची उपस्थिती होती.