शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

माहूर रेणुका माता मंदिरात जयघोषात घटस्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:23 IST

शहरातील गडावर असलेल्या श्री रेणुकामाता मंदिरात शारदिय नवरात्रोत्सवात भक्तीमय वातावरणात घटस्थापना करुन सुरूवात झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीक्षेत्र माहूर : शहरातील गडावर असलेल्या श्री रेणुकामाता मंदिरात शारदिय नवरात्रोत्सवात भक्तीमय वातावरणात घटस्थापना करुन सुरूवात झाली.जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विश्वस्त समितीचे अध्यक्ष सुधीर कुलकर्णी यांच्या हस्ते महाआरती कुमारिका पुजनही संपन्न झाले. घटस्थापनेच्या दिवशीच विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सपत्निक पुजा केली. सोबतच दुपारी शिवसेनेचे आ़ हेमंत पाटील यांनीही मातेचे दर्शन घेतले.शारदिय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी अध्यक्ष सुधीर कुलकर्णी, उपाध्यक्ष आसाराम जहारवाल, सचिव नरेंद्र देशमुख, कोषाध्यक्ष सिद्धेश्वर वरनगांवकर, विश्वस्त विनायकराव फांदाडे, चंद्रकांत भोपी, संजय कान्नव, भवानीदास भोपी, सामेर भोपी, श्रीपाद भोपी, आशिष जोशी यांच्या उपस्थितीत विधीवत मातेची पूजा करुन अलंकार पैठणी महावस्त्र चढवून महाआरती करुन भाविकांसाठी महाप्रसाद सुरू करण्यात आला.नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पहाटे ५ वाजेपासूनच भाविक श्री रेणुका मातेच्या दर्शनार्थ रांगेत उभे होते. देवस्थानकडून भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, महाप्रसाद, सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रतिपदा निमित्त प्रसिद्ध सनईवादक निमित्त धुमाळ यांच्या सुमधूर सनई वादनाने वातावरण आणखीनच भक्तीमय झाले होते. स.पो.अ. अविनाश बारगळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पो.नि. अभिमन्यू साळंके, सपोनि शिवप्रकाश मुळे, पो.उप.नि. अनंतसिंह चौहाण, धावारे यांने चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. डी.एम. धूतमल यांनी गडावर नेण्यासाठी पुरेशा एस.टी. बसेस सज्ज ठेवल्याने भाविकांना दर्शन सोयीचे झाले.किनवट येथील प्रसिद्ध, कृष्णप्रिय गोशाळा यांचेकडून आलेल्या ३५ हजारांवर भाविकांना मोफत महाप्रसाद स्वच्छ पाणी, शहरातील टी पॉइंट येथे दरवर्षी प्रमाणे दिले गेल्याने भाविकांतून समाधान व्यक्त केले जात होते.