औरंगाबाद : महापालिका आणि महावितरण कंपनीच्या भांडणात जनतेला पाण्यासाठी यातना भोगाव्या लागत आहेत. दोन्ही संस्थांच्या असक्षम यंत्रणांमुळे नागरिक पाण्यासाठी भटकत आहेत. मनपाची जलवितरण यंत्रणा दोषपूर्ण आहे. त्यामुळे जलवाहिन्यांची गळती वाढलेली आहे, तर महावितरणची वीजपुरवठा यंत्रणा सक्षम नाही. त्यामुळे विजेचा लपंडाव होत असल्याने जायकवाडी, फारोळा येते अडचणी येत आहेत. परिणामी, सिडको-हडको आणि शहरातील अनेक भागांमध्ये कमी-अधिक दाबाने पाणीपुरवठा होत आहे. महावितरण आणि महापालिकेच्या असक्षम यंत्रणेमुळे १ मे ते १५ जूनपर्यंत या ४५ दिवसांमध्ये २१ वेळेस वीज गेल्याचे दिसते. यामध्ये १० वेळेस मनपाचा ट्रान्सफॉर्मर बिघडला. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा झाला नाही. उर्वरित ११ वेळेस महावितरणच्या यंत्रणेमुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. दोन्ही संस्थांनी शहराला पाण्यासाठी भटकंती करण्यासाठी ५०-५० टक्के वाटा उचलला आहे. हे यातून स्पष्ट होत आहे. फारोळा येथील पंपगृहात मनपाचा ट्रान्सफॉर्मर आहे. विजेचा दाब कमी-जास्त झाल्यास तो ट्रान्सफॉर्मर जळला, असे मनपाचे मत आहे, तर महावितरणच्या मते ट्रान्सफॉर्मर सदोष असल्यामुळे वीज जाण्याचा प्रकार घडतो. ४० तास गेली वीज४५ दिवसांत ४० तास वीजपुरवठा खंडित झाला आहे. मनपाच्या ट्रान्सफॉर्मरमुळे २० तास, तर वादळी पाऊस व इतर ढोरकीनच्या फिडरमुळे महावितरणकडून २० तास वीजपुरवठा खंडित झाला. ५ मिनिटे जरी वीज गेली तरी त्याचा परिणाम म्हणून शहराला १ तास उशिरा पाणी येते. ४५ दिवसांत १७ दिवस विजेचा लपंडाव१ मे क्रांतीचौक, २ मे नक्षत्रवाडी, ४ व ५ मे ढोरकीन पंप हाऊस, १४ मे नक्षत्रवाडी, २१ मे ढोरकीन, नक्षत्रवाडी, २२ मे जायकवाडी पंप हाऊस, जायकवाडी नवीन योजना, फारोळा ट्रिपिंग, ढोरकीन, नक्षत्रवाडी, २३ मे फारोळा पंप हाऊस, नक्षत्रवाडी, २६ मे जायकवाडी जुने, जायकवाडी नवीन, ३० व ३१ मे फारोळा ट्रिपिंग, ढोरकीन, १ जून ढोरकीन, नक्षत्रवाडी, २ जून जायकवाडी, ढोरकीन, ३ जून जायकवाडी जुने, फारोळा ट्रिपिंग, ढोरकीन, ४ जून जायकवाडी जुने पंप, ६ जून फारोळा येथे ट्रिपिंग झाले. १२ जून रोजी मनपाच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला.
महावितरण, महानगरपालिकेच्या भांडणात जनतेला यातना
By admin | Updated: June 16, 2014 01:11 IST