शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

महावीर चौकातील उड्डाणपुलाला गळती!

By admin | Updated: July 6, 2016 00:38 IST

औरंगाबाद : मंगळवारी दुपारनंतर सुरू झालेल्या दमदार पावसाने शहरात दाणादाण उडवून दिली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बांधलेल्या महावीर चौकातील नवीन उड्डाणपुलालाही पावसामुळे गळती लागली.

औरंगाबाद : मंगळवारी दुपारनंतर सुरू झालेल्या दमदार पावसाने शहरात दाणादाण उडवून दिली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बांधलेल्या महावीर चौकातील नवीन उड्डाणपुलालाही पावसामुळे गळती लागली. २० जून रोजी सिडको आणि महावीर चौकातील पुलांचे लोकार्पण झाले. त्यानंतर १५ व्या दिवशी शहरात झालेल्या ६६.५ मि.मी. पावसाने महावीर चौकातील पुलाला गळती लावली. यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या पादचाऱ्यांचे लक्ष पुलाला लागलेल्या गळतीकडे गेले. एमएसआरडीसीने बांधलेल्या त्या उड्डाणपुलाची ‘प्रूफ लोड टेस्ट’ मुंबईतील व्हीजेटी या संस्थेने प्रकल्प व्यवस्थापन समितीने केल्यानंतर पूल वाहतुकीला खुला करण्यात आला. पुलाच्या पहिल्या पिलर (कॉलम) पासून दुसऱ्या पिलरपर्यंतचे अंतर ५० मीटरपर्यंत आहे. त्यामुळे ही चाचणी करण्यात आली. महावीर स्तंभाच्या उजव्या आणि डाव्या बाजूचा पिलर हा २५ मीटर अंतरावर आहे. त्यामुळे पुलावरील काँक्र ीटचा ट्रान्सपोर्ट पॅसेज मोठा आहे. त्यात मोठ्या प्रमाणात लोखंडाचा वापर करण्यात आला आहे. पुलाच्या दोन्ही स्लॅबमध्ये सांध असल्यामुळे गळती लागली. अभियंते म्हणाले, पुलाच्या काँक्रीटमधील लोखंडावर गळतीमुळे परिणाम होऊ शकतो का? यावर एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता विक्रम जाधव म्हणाले, दोन स्पॅन वेगवेगळे आहेत. दुभाजकामध्ये गॅप आहे. ५० मीटरपर्यंत स्लॅबचे अंतर आहे. मधोमध पोकळ जागा असल्यामुळे दुभाजकातून ते पाणी झिरपले तरी त्याचा पुलाच्या स्लॅबला काहीही धोका होत नसतो. तरीही बुधवारी पुलाची पाहणी करण्यात येईल. नव्या पुलाला गळती लागल्याने खळबळ उडाली आहे.