शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
2
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
3
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
4
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
5
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
6
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
7
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
8
आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्षकाळ, जाणून घ्या  
9
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
10
मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू
11
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
12
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
13
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
14
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
15
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
16
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
17
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
18
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
19
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
20
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा

जमिनीतील कर्बाने गाठला निचांक

By admin | Updated: August 31, 2014 01:11 IST

जगदीश पिंगळे , बीड मराठवाड्यातील पीक लागवडीच्या एकूण क्षेत्रापैकी ५० टक्केच्यावर जमिनी नापिक होत असून जमिनीतील कर्बाचे प्रमाण केवळ ०.३ ते ०.५ पर्यत गेले आहे.

जगदीश पिंगळे , बीड मराठवाड्यातील पीक लागवडीच्या एकूण क्षेत्रापैकी ५० टक्केच्यावर जमिनी नापिक होत असून जमिनीतील कर्बाचे प्रमाण केवळ ०.३ ते ०.५ पर्यत गेले आहे. जमिनीचा पोत सांभाळण्यासाठी तिला विश्रांती देणे अनेकदा गरजेचे असते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.पावसाचे अत्यल्प प्रमाण आणि जमिनीतील अन्नद्रवाचे अतिरेकी शोषण वाढल्यामुळे कर्बाचे प्रमाण ०.३ ते ०.५ असे झाले आहे. कर्बाला जर जमिनीचा श्वास म्हटले तर ती जमिन आता मृत घोषीत करावी की काय अशी पाळी आली आहे, अशी प्रतिक्रीया पाणलोट क्षेत्रात गेल्या अनेक वर्षे काम करणारे पर्यावरणवादी विचारवंत सय्यद एस.बी.यांनी दिली आहे.मराठवाड्यात गेल्या पंधरा वर्षात खाजगी आणि सहकारी क्षेत्रातील साखर कारखाने मोठ्या प्रमाणावर वाढले. उसाचे क्षेत्र वाढले. त्या तुलनेत जमिनीत पाणी झिरपविण्याचे प्रमाण कमी झाले, असे मराठवाडा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कालीदास आपेट यांनी सांगितले. सध्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि अहमदनगर जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार ८५८ हेक्टर जमीन सिंचनाखाली येते.पुणे येथे गुण नियंत्रण विभागाचे संचालक असलेले जयंत देशमुख म्हणाले, मराठवाड्यात ४० टक्के जमीन हलकी आहे. नगदी पिकांच्या रेलचेलीच्या काळात आलटून पालटून जमिनीच्या पट्यांना विश्रांती देणे गरजेचे आहे.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मृद संधारण विभागाचे प्रमुख डॉ. व्ही. डी. पाटील म्हणाले की माती परीक्षण सध्या महत्वाचे झाले आहे. मृद साक्षरता ही साक्षरतेच्या मोहिमेतील नवीन संकल्पना नव्या पिढीतील शेतकऱ्यांनी आत्मसात करावी. तरच जमिनीची सुपिकता राहील. गेल्या चाळीस वर्षापासून जमिनीची सेंद्रीय घटकांची मात्रा कमी कमी होत आहे. सध्या हे प्रमाण ०.३ ते०.५ आहे. जमिनीच्या एक हेक्टर तुकड्यातून आपण १८० किलो नत्र, पालष, स्फुरद, गंधक, पिकाद्वारे काढीत असतो आणि त्या तुलनेत फक्त १२० किलो सेंद्रीय खत देतो.जमिनीत ‘मल्टी डिफेसेंन्सी’ होत आहे, असे ही डॉ. पाटील म्हणाले. लोह , जस्त यांची कमतरता हा गंभीर मुद्दा आहे. त्यामुळे एकूण जमिनीची सुपिकता सध्या सलाईनवर आहे, अशी चिंता मान्यवरांनी व्यक्त केली. जमिनितील कर्ब वाढविण्यासाठी व्यापक स्वरुपात प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. जमिनितील कर्ब वाढला तरच सुपिकता वाढेल परिणामी उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होईल. यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रीय खताचा वापर करणे काळाची गरज बनली आहे, असे झाले तरच जमिनितील कर्ब वाढू शकतो.