यंदा खरीप हंगामामध्ये शेतकऱ्याच्या तोंडातला घास निसर्गाने हिरावून घेतला. रबी हंगामात गहू, ज्वारी पिकांना पाणी देण्याची वेळ आली आहे. वीज पुरवठा नियमित नसल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल, हे आश्वासन हवेतच विरले आहे. कमी दाबाचा वीजपुरवठा असल्यामुळे विद्युत पंप सुरु होत नाही. त्यामुळे पीके पिवळी पडत असून, वीजपुरवठ्याची सेवा करण्यात आली नाही तर रब्बी हंगाम खरीप हंगामात सारखा वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महावितरण विभागाच्या वतीने वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी माजी सरपंच प्रल्हाद हिवराळे, संजय हिवराळे, सांडू शेळके, दादाराव वीर, मिठू गायके, भानुदास हिवराळे, अशोक हिवराळे, रामसिंग धनावत यांनी केली आहे.
कमी दाबाचा वीज पुरवठा; रबी हंगाम धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:27 IST