शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

चक्क भंगार वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र

By admin | Updated: July 18, 2016 01:11 IST

औरंगाबाद : औरंगाबाद आरटीओ कार्यालय विविध कारणांमुळे कायम चर्चेत राहत आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद आरटीओ कार्यालय विविध कारणांमुळे कायम चर्चेत राहत आहे. बोगस फिटनेस प्रमाणपत्र देणे आणि कोट्यवधींच्या करबुडवेगिरी प्रकरणानंतर आता चक्क भंगार वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र दिल्याचा प्रताप उघड झाला आहे. याविषयी काहींनी थेट परिवहन आयुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे चार मोटार वाहन निरीक्षकांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.आरटीओ कार्यालयातर्फे अवजड वाहनांची पासिंग, फिटनेसचे कामकाज शेंद्रा एमआयडीसी येथे केले जाते. डिसेंबर २०१५ मध्ये एका मोटार वाहन निरीक्षकांनी फिटनेस प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी नसतानाही तब्बल ७०० वाहनांचे बोगस फिटनेस दिल्याचे कार्यालयाच्या निदर्शनास आले होते. संबंधित निरीक्षकांवर फेब्रुवारीमध्ये निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच आरटीओ कार्यालयात ट्रान्सपोर्ट संवर्गातील वाहन नॉन ट्रान्सपोर्ट संवर्गात रुपांतरित करताना नियमानुसार कर न भरता शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडविल्याचा प्रकार समोर आला. यामध्ये २०११-१३ या कालावधीत ६०० पेक्षा अधिक वाहनांनी अशा प्रकारे कर बुडविल्याचे समोर आले. याप्रकरणी तत्कालीन अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. सध्या डोळे झाकून फिटनेस प्रमाणपत्र वाटप केले जात असल्याचे दिसते. भंगार वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले आहे.