शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

साडेतेरा लाखांची लूट

By admin | Updated: August 6, 2015 01:04 IST

कन्नड : महाराष्ट्र बँकेच्या कन्नड तालुक्यातील कालिमठ (उपळा) येथील शाखेत मंगळवारी रात्री चोरट्यांनी धाडसी चोरी केली. खिडकीचे गज कापून

कन्नड : महाराष्ट्र बँकेच्या कन्नड तालुक्यातील कालिमठ (उपळा) येथील शाखेत मंगळवारी रात्री चोरट्यांनी धाडसी चोरी केली. खिडकीचे गज कापून आत शिरलेल्या चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने बँकेची तिजोरी फोडली. त्यात असलेले तब्बल १३ लाख ६९ हजार २६२ रुपयांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले. बुधवारी सकाळी हा प्रकार उजेडात येताच एकच खळबळ उडाली.घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, महाराष्ट्र बँकेची ही शाखा उपळा गावाच्या अगदी बाहेर आहे. बँकेच्या पुढे एकही घर, वस्ती नाही. नित्याप्रमाणे मंगळवारी सायंकाळपर्यंत बँकेत कामकाज सुरू होते. सायंकाळी बँक बंद करून कर्मचारी घरी निघून गेले. त्यावेळी बँकेच्या तिजोरीत साडेतेरा लाखाच्या वर रोख रक्कम ठेवण्यात आलेली होती. दरम्यान, बुधवारी चोरट्यांनी बँक इमारतीच्या जवळून जाणाऱ्या पितळखोरा रस्त्याकडील खिडकीची तकलादू लोखंडी जाळी कापून आत प्रवेश केल्याचे दिसते. या चोरट्यांनी सोबत गॅस कटरही आणलेले होते. ४या कटरच्या साहाय्याने त्यांनी तिजोरी कापली व तिजोरीतील १३ लाख ६९ हजार २६२ रुपये रोख रक्कम घेऊन धूम ठोकल्याचे स्पष्ट झाले. या चोरी प्रकरणी शाखा प्रबंधक धनंजय पाटणकर यांनी कन्नड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या बँक प्रशासनाने सुरक्षाबाबत अक्षरश: हलगर्जीपणाचा कळसच केलेला दिसतो. एक तर ही बँक गावाच्या अगदी बाहेर आहे. बँकेला ना वॉचमन ठेवण्यात आलेला आहे, ना सीसीटीव्ही कॅमेरे तेथे बसविण्यात आलेले आहेत. बँकेच्या खिडकीचे गजही अत्यंत तकलादू होते. विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वीच पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या हद्दीतील बँकेच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावा, सुरक्षारक्षक तैनात करा, अशा सूचना केलेल्या होत्या. त्याकडेही बँकेने दुर्लक्ष केले.