शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

संवेदनशील केंद्रावर करडी नजर

By admin | Updated: February 6, 2017 23:48 IST

जालना : जिल्हा परिषद ५६ गट आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी प्रशासनासह पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

जालना : जिल्हा परिषद ५६ गट आणि पंचायत समित्यांच्या ११२ गणांसाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी प्रशासनासह पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील १० अतिसंवेदनशील आणि १०२ संवेदशील मतदान केंद्रांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. निवडणुकीच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्यातील हिटलिस्टवर असलेल्या गुन्हेगारांना आत्तापासूनच स्थानबद्ध करण्यात येत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. यासाठी जिल्ह्यातील १८ पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना याबाबत सूचना केल्या आहेत. आपापल्या तालुक्यातील संवेदनशील केंद्राची पाहणी करून उपद्रव माजविणाऱ्या गुन्हेगारांवर बारीक नजर राहणार आहे. शिवसेना, भाजपा पक्षाची युती तुटली आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने मिनी मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. चारही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे अनुचित प्रकार टाळावेत, निवडणूक निर्भय वातावरणात व्हावी, यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाई सुरू केली आहे. घनसावंगी तालुक्यात ३, अंबड २, जालना १ बदनापूर २ आणि मंठा तालुक्यात २ असे दहा अतिसंवेदनशील मतदान केंद्र असल्याने या मतदान केंद्रावर पोलीस यंत्रणेसह राज्य राखीव पोलीस दलाचे कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. १६ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे, त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दल तसेच प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली आहे. संवेदशील गावातील पोलीस पाटील तसेच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व सदस्यांना मार्गदर्शन करून मतदान शांततेत करण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या केंद्रावर कोणताही गैरप्रकार अथवा वाद होऊ नये म्हणून प्रशासनाकडून माहिती संकलित करण्यात आली आहे. भोकरदन व तालुक्यात सर्वाधिक संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. या केंद्रावर पोलीस दलाच्या वतीने विशेष बंदोबस्तासह छायाचित्रणही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. पोलीस पाटील व तंटामुक्त गाव समिती सदस्यांनी मतदान शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)