शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

घरफोडीत तीन लाखांसह १२ तोळे सोने लंपास

By admin | Updated: March 2, 2015 00:53 IST

परळी : तालुक्यातील मांडखेल येथील एका घरामध्ये चोरट्याने घुसून तीन लाख रूपयांची नगदी रोकड व ११ तोळे ६०० ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण पाच लाख १२ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आहे.

परळी : तालुक्यातील मांडखेल येथील एका घरामध्ये चोरट्याने घुसून तीन लाख रूपयांची नगदी रोकड व ११ तोळे ६०० ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण पाच लाख १२ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली.परळी तालुक्यातील मांडखेल येथे बाळासाहेब माणिक घुगे हे वास्तव्यास आहेत. त्यांनी परळी तालुक्यातील नाथापिंप्री येथे जमीन खरेदी केली होती. खरेदीनंतर त्यांच्याकडे तीन लाख रूपये शिल्लक होते. लोकांकडून घेतलेले हातउसणे पैसे परत देण्याचा त्यांचा विचार होता. मात्र शनिवारी रात्री त्यांच्या घरामध्ये चोरट्याने प्रवेश केला. त्यानंतर घरातील एका खोलीमध्ये असलेल्या दोन लोखंडी पेटीतील तीन लाख रूपयांची रोकड, ११ तोे ६०० ग्रॅम सोने असा एकूण पाच लाख १२ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल पळवून नेला. घरात घुसताना खिडक्याच्या सळया तोडण्यात आल्या होत्या. चोरी करून जाताना चोरांनी याच सळ्या गावाबाहेर असलेल्या एका स्मशानभूमीमध्ये फेकून दिल्या होत्या. सकाळी चोरी झाली असल्याची बाब घुगे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस उपअधीक्षक अभय डोंगरे, एडीएस सहायक पोलीस निरीक्षक भारत राऊत व परळी ग्रामीणचे पोलीस अधिकारी, कर्मचारी येथे दाखल झाले. बाळासाहेब घुगे यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद दाखल झाला आहे. (वार्ताहर)