लातूर : घरची परिस्थिती अत्यंत कमकुवत़ वडिल दररोज मजुरीस जातात़ आई घरकाम करते़ त्यामुळे एवढ्या लहान वयात विमानात बसायला मिळण्याबरोबरच हवाई सफर करण्याची संधी मिळेल अशी मनातच नव्हे तर स्वप्नातही अपेक्षा नव्हती़ हे न पाहिलेले स्वप्न लोकमतमुळे पूर्ण होत असल्याची भावना निशा संतोष भावे हिने व्यक्त केली़लोकमत आयोजित संस्कारांचे मोती निसर्ग सफारी स्पर्धेत लातुरातील श्रीमती गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालयातील निशा संतोष भावे हिची जिल्ह्यातून मुंबई- दिल्ली- मुंबई या हवाई सफरसाठी निवड झाली आहे़ या हवाई सफरसाठी निवड झाल्याचे समजताच अत्यंत आनंद झाल्याचे सांगून निशा म्हणाली, ही आनंदाची माहिती मी माझ्या मोठ्या बहिणीला सर्वात अगोदर दिली़ तेव्हा तिने काहीही विनोद सांगू नकोस असे म्हणत तिने माझ्यावर विश्वासच ठेवला नाही़ आई- वडिलांकडे माझ्या निवडीची माहिती घेतल्यानंतर तिने मला शुभेच्छा दिल्या़लातुरातील साळी गल्लीतील भाड्याच्या घरात आई- वडिलांसह पाचजण राहतो़ शेती नसल्याने वडिल दररोज मजुरीने जातात़ आई घरकाम करते़ त्यामुळे वडिलांच्या कमाईवर तिघा भावंडाचे शिक्षण करण्याची जबाबदारी आहे़ अशा परिस्थितीतून आम्ही कुटुंबासह सुट्यांमध्ये नैसर्गिक सहलीचा आनंद घेतो़ आजपर्यंत मी केवळ बस आणि रेल्वेने प्रवास केला आहे़ घरच्या परिस्थितीमुळे एकदाही विमानाने प्रवास केला नाही आणि कधी आपण विमानाने प्रवास करु याची मनात कल्पनाही आली नाही़ त्यामुळे विमानाने प्रवास करण्याचे स्वप्नही पाहिले नाही़ परंतु, लोकमतच्या सा स्पर्धेत सहभागी झाल्याने मला हे भाग्य लाभले असल्याचे निशा म्हणाली़लोकमतमुळे कुणालाही संधी मिळू शकते याचा विश्वास बसला असल्याचे सांगून निशा म्हणाली, अनेकदा वर्गातील मैत्रिणी हवाई सफरविषयी चर्चा करतात़ तेव्हा या सफरविषयी मोठी उत्सुकता लागत असे़ आता प्रत्यक्षात विमान प्रवासाची संधी मिळणार असल्याने या सफरविषयी माहिती मी माझ्या मैत्रिनींना सांगणार आहे़ तसेच एक अल्बम तयार करुन तोही दाखविणार आहे़ (प्रतिनिधी)पोटाला चिमटा़़़घरची परिस्थिती बिकट असल्याने माझे पालक पोटाला चिमटा घेऊन शैक्षणिक खर्च भागवित आहेत़ त्याचबरोबर वर्षातून किमान दोनदा छोटेखानी निसर्गसहल होते़ पण आता नवीन सहलीचा आनंद मिळणार असल्याचे निशा म्हणाली़ मुलींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही पती- पत्नी नेहमी प्रयत्नशील असतो़ आमच्या लेकरांनीही हवाई सफर करावी अशी नेहमी इच्छा होत असे़ ती इच्छा लोकमतमुळे पूर्ण होत असल्याचे संतोष भावे व रेणूका भावे यांनी सांगून लोकमतचे आभार मानले़
‘लोकमत’ने दिली हवाई सफरीची संधी
By admin | Updated: July 3, 2014 00:18 IST