शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाराच्या मुळावर उठला लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:03 IST

४ तास वग‌ळता वाहतूक बंद राहणार असल्याने त्याचा सर्वात मोठा फटका रिक्षा व्यावसायिकांना बसला आहे. शहरात ३० हजार रिक्षा ...

४ तास वग‌ळता वाहतूक बंद राहणार असल्याने त्याचा सर्वात मोठा फटका रिक्षा व्यावसायिकांना बसला आहे. शहरात ३० हजार रिक्षा तर ४५ हजार रिक्षाचालक आहेत. बहुसंख्य रिक्षाचालक हे रिक्षा भाड्याने घेऊन चालवितात. त्यांच्यासमोर पुढचे १० दिवस तरी रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला. लॉकडाऊन त्यांच्यासाठी सहन करण्यापलिकडचा आहे.

असंघटित क्षेत्रातील कामगार अकुशल मजूर यांची संख्या शहरात प्रचंड आहे. कामगार चौक, टीव्ही सेंटर, उस्मानपुरा, शहागंज येथे रोज सकाळी हे मजूर कामाच्या शोधात उभे राहतात. रोजगार मिळाला तर सायंकाळी त्यांची चूल पेटते. पुढचे १० दिवस त्यांच्यासाठी कामच नसणार. त्यांच्या जगण्याचा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

या लॉकडाऊनमधून बांधकाम क्षेत्राला दिलासा मिळाला असे दिसते, पण ते वास्तव नाही. बांधकामाच्या जागेवर मजुरांच्या राहण्याची व्यवस्था असेल तर ते बांधकाम चालू राहू शकते, पण बहुसंख्य ठिकाणी विकासकांची अशी व्यवस्था नसते. त्यामुळे वरकरणी हा दिलासा दिसत असला तरी वास्तवात तसे नाही. बहुसंख्य बांधकाम कारागीर, मजुरांचे हात रिकामेच राहणार आहेत.

स्टोव्ह, गॅस, मिक्सर, चेन दुरुस्त करणारे. पंक्चर काढणारे, शिंपी, सराफी दुकानातील कारागीर, ट्रक, दुकानांच्या शटरला ग्रिसिंग करणारे गटाई कामगार, घड्याळ दुरुस्ती, चष्मा दुरुस्ती, डुप्लिकेट चावी तयार करणारे, गॅरेज, सायकल दुरुस्ती असे एक ना अनेक बारिकसारिक उद्योगाचे काय? या सर्वाच्या मुळावर लॉकडाऊन उठला आहे.