सिल्लोड तालुक्यातील ७० पशुसेवकांनी १५ जुलैपासून बेमुदत संप पुकारला आहे. परिणामी जनावरांवरील उपचार थांबले असून पशुपालक त्रस्त झाले आहेत. ही बाब शासनाच्या लक्षात कशी येत नाही. त्यामुळे पशुसंवर्धन आयुक्तांनी घेतलेला अहितकारी निर्णय मागणे घेऊन पशू पर्यवेक्षकांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रामनाथ भोजने, उपाध्यक्ष सुनील खराडे, सचिव चंद्रकांत दांडगे, सदस्य लक्ष्मण खंबाट, राहुल जगताप, सारंगधर वाडेकर, अनिस बेग, संदीप पाटील, कृष्णा जैवळ, शैलेंद्र साळवे, रामभाऊ भावले, मनोहर गोरे, शरद जाधव, एकनाथ हिवाळे, साळुबा खिल्लारे, स्वप्निल बोर्डे, कैलास आरके, शुभम पंडित, गणेश राकडेसह आदींची उपस्थिती होती.
170721\img-20210717-wa0335.jpg
क्याप्शन
विविध मागण्यांचे निवेदन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना देताना पशु सेवक दिसत आहे.