शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भर उन्हात निकाल ऐकण्यासाठी कान स्पिकरकडे

By admin | Updated: October 20, 2014 00:33 IST

सोमनाथ खताळ ,बीड लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला. बीड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात हा निकाल जाहीर करण्यात आला.

सोमनाथ खताळ ,बीडलोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला. बीड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात हा निकाल जाहीर करण्यात आला. निकाल ऐकण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते आले होते. भर उन्हातही कार्यकर्त्यांचे कान स्पिकरकडे असल्याचे दिसून आले. एकूणच कार्यकर्त्यांच्या गर्दीने बाजार समितीचा परिसर फुलून गेला होता. निकालाची लागलेली उत्कंठता अखेर रविवारी पुर्ण झाली.बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यातील ६ मतदारसंघातून निवडणूक घेण्यात आली. तसेच लोकसभेची पोटनिवडणूकही घेण्यात आली होती. बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर रविवारी या दोन्ही निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला. यावेळेसची विधानसभेची निवडणूक एकतर्फी ठरली. सहा विधानसभा मतदारसंघातून ५ भाजपाचे उमेदवार तर बीड मधून जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे एकमेव उमेदवार विजयी झाले. आपल्या मतदारसंघातील उमेदवार विजयी होणार का? हे पाहण्यासाठी ज्या-त्या मतदारसंघातील कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते सकाळपासूनच बाजार समिती परिसरात येताना दिसून आले. सकाळी ८ वा. मतमोजणीला सुरुवात झाली. सहा मतदारसंघातील वेगवेगळ्या फेऱ्यांनुसार मतमोजणी पार पडली. प्रत्येक फेरीमध्ये आपल्या लाडक्या उमेदवाराला किती मते मिळतात? हे ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांचे कान स्पिकरकडे असल्याचे दिसून आले. बाजार समितीच्या मागच्या बाजुच्या प्रवेशद्वारातून निकाल जाहीर केला जात होता.समोरच्या बाजुसही कार्यकर्त्यांची मोठी रेलचेल होती. गेवराई, केज, माजलगाव या तीन मतदारसंघातील उमेदवारांचा मतांचा आघाडी, पिछाडीचा चाललेला खेळ कार्यकर्त्यांचे ठोके वाढवत होता. शेवटी कार्यकर्त्यांची ही उत्कंठता चारनंतर शांत झाली. सकाळी ८ वाजेपासूनच कार्यकर्त्यांना निकाल ऐकण्यासाठी उत्सुकता लागली होती. अनेकजण आपल्या ओळखीच्या लोकांना फोन करुन निकालाची माहिती देताना दिसून आले.